हायलाइट्स:
- सुशांत सिंह राजपूत ऑडिशनमध्ये कधीच अपयशी ठरला नाही
- मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
- सुशांतच्या पहिल्यासाठी सिनेमासाठी कास्टिंग डायरेक्टर होते मुकेश
अनेक उत्तम सिनेमांत सुशांतने केले काम
छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने सुशांतला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत सुशांतने साकारलेली मानवची भूमिका आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यानंतर त्याने मोठ्या पडद्यावर अभिनय करायला सुरुवात केली. सुशांतने ‘काय पो छे’ या सिनेमापासून आपल्या चित्रपट करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने पीके, एम.एस. धोनी, शुद्ध देसी रोमांस, छिछोरे, केदारनाथ यांसारख्या उत्तम सिनेमांत काम केले.
सुशांतने ज्या ज्या सिनेमांसाठी ऑडिशन दिली त्यामध्ये तो कधीही अपयशी ठरला नव्हता. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत याची माहिती दिली.
या व्हिडीओमध्ये मुकेश यांनी सुशांतच्या सिनेमांचा प्रवासाची झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये सुशांतने ‘पीके’ सिनेमासाठी दिलेल्या ऑडिशनचीही झलक आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना मुकेश यांनी लिहिले आहे की, ‘सुशांतसिंह राजपूत, जो कधीच ऑडिशनमध्ये नापास झाला नाही. त्याने आपल्या नैसर्गिक अभिनयाद्वारे लाखो लोकांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. अशा या गुणी कलाकाराला मनापासून श्रद्धांजली.’
मुकेश छाब्रा आणि सुशांत यांच्यामध्ये घट्ट असे बाँडिंग होते. सुशांतचा पहिल्या सिनेमासाठी कास्टिंग डायरेक्शन मुकेश यानेच केले होते. इतकेच नाही तर सुशांतच्या शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ साठी मुकेश हाच कास्टिंग डायरेक्टर होता.