हायलाइट्स:
- लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये होतो मनोज बाजपेयीच्या पत्नीचा समावेश
- हृतिक रोशन – अजय देवगण यांसोबत केलं आहे काम
- शबाना नाही तर नेहा नावाने आहे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध
‘नुसरतनेच मला फसवलं, तिच्या पोटातलं बाळ माझं नाहीच!’
‘करीब’ चित्रपटातून केलं होतं पदार्पण
शबानाने नेहा या नावाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा पहिला चित्रपट होता तो बॉबी देओल सोबतचा ‘करीब’. त्यानंतर शबानाने अजय देवगणसोबत ‘होगी प्यार की जीत’ आणि हृतिक रोशनसोबत ‘फिजा’ चित्रपटात काम केलं. ‘फिजा’ चित्रपटातील ‘आजा माहिया’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. परंतु, गूगलवरही शबानाला शोधण्यासाठी शबाना नाही तर नेहा नावाचा उपयोग करावा लागतो.
बॉलिवूड चित्रपटासाठी बदलावं लागलं नाव
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी चित्रपट निर्मात्यांनी शबानाला नाव बदलण्याची ताकीद दिली होती. शबानावर नाव बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. शबानाला असं करणं मुळीच पसंत नव्हतं. एका मुलाखतीत शबानाने म्हटलं होतं की, ‘माझ्या आई- वडिलांनी खूप प्रेमाने माझं नाव ठेवलं होतं. माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मी या गोष्टीसाठी मुळीच तयार नव्हती. माझं नाव बदलायची गरज नव्हती पण कोणीही माझं ऐकलं नाही.’
संजय गुप्ता यांच्या चित्रपटातून मिळाली हरवलेली ओळख
संजय गुप्ता यांच्या चित्रपटात शबानाने तिच्या खऱ्या नावाने अभिनय केला होता. शबानाने सांगितल्याप्रमाणे, संजय आणि त्यांच्या टीमसोबत काम करणं हा खूप चांगला अनुभव होता कारण त्यांनी शबानाला तिच्या खऱ्या नावाने काम करू दिलं. मी माझी ओळख विसरले होते ती मला पुन्हा मिळाली, असं शबानाने म्हटलं होतं. यासोबत शबानाने तमिळ आणि कन्नड चित्रपटातही काम केलं आहे.