Home मनोरंजन ‘२६ जूनला माझं लग्न आहे, मला जाऊ द्या’, सिद्धार्थ पिठानीची न्यायालयाकडे मागणी

‘२६ जूनला माझं लग्न आहे, मला जाऊ द्या’, सिद्धार्थ पिठानीची न्यायालयाकडे मागणी

0
‘२६ जूनला माझं लग्न आहे, मला जाऊ द्या’, सिद्धार्थ पिठानीची न्यायालयाकडे मागणी

[ad_1]

हायलाइट्स:

  • सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीनं केली आहे अटक
  • सिद्धार्थ पिठानीनं न्यायालयात जामिनासाठी केला आहे अर्ज
  • लग्नाचं कारण देत सिद्धार्थ पिठानीनं केली जामिनाची मागणी

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतशी संबंधीत ड्रग्स प्रकरणात त्याचा मित्र आणि फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली असून आता सिद्धार्थनं न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दिला आहे. सिद्धार्थ पिठानीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं २८ मे रोजी हैदराबादमधून अटक केली होती. त्यानंतर १४ दिवसांसाठी त्याची रवानगी तुरंगात करण्यात आली होती. आता जामिनासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जात सिद्धार्थनं आपल्या लग्नाचं कारण दिलं आहे. १४ जून २०२० रोजी सुशांतच्या आत्महत्येवेळी सिद्धार्थही घरी उपस्थित होता. त्यानेच सर्वप्रथम सुशांतचा मृतदेह पाहिला होता आणि सुशांतची बहीण मीतू सिंहला याची माहिती दिली होती.

वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीनं शेतकामात कसली कंबर

एनसीबीनं सिद्धार्थला त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यामातून ट्रॅक करून अटक केली. सिद्धार्थ अटक करण्याच्या एक आठवडा अगोदरच त्याचा साखरपुडा झाला होता. सिद्धार्थचे वकील तारक सईद यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, ‘२६ जूनला सिद्धार्थचं लग्न अगोदरच ठरलेलं आहे. त्यामुळे त्याला अंतरिम जामिन देण्यात यावा. जेणेकरून तो लग्न करू शकेल. लग्नानंतर तो पुन्हा सरेंडर करेल.’


एकीकडे सिद्धार्थच्या वकिलांनी त्याच्या लग्नाचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे मात्र दुसरीकडे एनसीबीच्या म्हणणं आहे की, त्यांना सिद्धार्थच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीय एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, ‘आम्हाला त्याच्या साखरपुड्याबद्दल माहिती देण्यात आली होती मात्र त्याच्या लग्नाच्या तारखेबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच लग्नाबाबत चर्चाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सगळ्याच्या आमच्या केसशी काहीही संबंध नाही.’


सिद्धार्थचे वकील तारक सईद यांनी सांगितलं, ‘सिद्धार्थच्या जामिनाच्या याचिकेवर १६ जूनला सुनावणी होणार आहे. यावेळी आम्ही सिद्धार्थला नियमित जामिनाऐवजी अंतरिम जामिन देण्यात यावा. जेणेकरून त्याला लग्न करता येईल आणि लग्नानंतर तो पुन्हा सरेंडर करेल आणि त्यानंतर नियमित जामिनावर सुनावणी केली जावी.’

करिनावर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे कारण

मागच्या वर्षी १४ जूनला सुशांतच्या आत्महत्येनंतर सिद्धार्थ पिठानीनंच पंख्याला लटकलेला त्याचा मृतदेह खाली उतरवला होता. एवढंच नाही तर सुशांतच्या बेडरुमचा दरवाजा आतून लॉक असल्यानं सिद्धार्थनंच चावीवाल्याला बोलावून आणलं होतं. सिद्धार्थच्या अटकेनंतर पुन्हा एकादा सुशांतच्या घरी काम करणारा स्टाफ केशव आणि नीरज यांचीही चौकशी करण्यात आली होती. तसेच सुशांतच्या बॉडीगार्डलाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.



[ad_2]

Source link