स्वीटू आणि ओम डेटला जातात.पण ज्या ज्या हॉटेलमध्ये ते जातात., तिथं कोण तरी ओळखीचे दिसतात. त्यामुळं स्वीटू ओमला वडापाव खाण्यासाठी घेऊन जाते. यादरम्यान, ती ओमला तुला कोणता वडापाव आवडतो? असा प्रश्न विचारते.पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याने वडापाव खाल्ला नसल्याचं लक्षात येत. यावर तू वडापावचं खाल्ला नाही का? असा प्रश्न ती ओमला विचारते. यावर तो ‘मी कधीच खाल्ला नााहीए वडा’, असं म्हणतो. ओमच्या या वाक्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.
मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येकानंच बटाटा वड्याची चव चाखलेली असते. असं असताना ओमनं आतापर्यंत बटाटावडा खाल्ला नाहीए, हे काही नेटकऱ्यांच्या पचनी पडेना, त्यामुळे सोशल मीडियावर यासंदर्भातले मीम्स व्हायरल होत आहेत.
रसिक प्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावलीसारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे.