हायलाइट्स:
- ‘द फॅमिली मॅन २’ मधील शारीब हाश्मीच्या पात्राचं होत आहे कौतुक
- शारीबला करायचं होतं सुशांतसोबत काम
- सुशांतच्या जाण्याने अर्धवट राहिली शारीबची इच्छा
कागदाच्या होड्या, माथेरानची सहल…मराठी कलाकारांच्या आठवणींचा पाऊस
सुशांतने मारली होती शारीबला मिठी
वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत शारीबने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. शारीबने सुशांतसोबतच्या भेटीचा किस्सा सांगत म्हटलं, ‘जेव्हा आमच्या ‘फिल्मीस्तान’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं, तेव्हा तिथे अनेक मोठंमोठे कलाकार आले होते. त्यात सुशांतदेखील होता. सुशांत चक्क माझ्या बाजूच्या सीटवर बसला होता. तो चित्रपट पाहत होता आणि मधेच हसत होता. त्यातही तो माझं कौतुक करत होता. चित्रपट संपला आणि सगळे उभे राहिले. सुशांत उभा राहिला आणि त्याने मला मिठी मारली. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा सुशांत एक लोकप्रिय अभिनेता बनला होता. इतकी लोकप्रियता मिळूनही तो खूप प्रेमळ आणि विनम्र होता. मला आजही त्याचा तो हसरा चेहरा आठवतो.’
सुशांतसोबत काम करता येणार नसल्याची आहे खंत
सुशांतसोबत काम करता येणार नसल्याची खंत व्यक्त करत शारीब म्हणाला, ‘प्रत्येकाला सुशांतसारख्या अभिनेत्यासोबत काम करायचंय. तो खूप हुशार होता सोबतच मनाने दिलदार होता. तेव्हा एका ‘तकदूम’ नावाच्या चित्रपटावर काम सुरू होतं. ज्यात सुशांत आणि परिणीती चोप्रा होते. मी देखील त्यांच्यासोबत काम करणार होतो. परंतु, काही कारणाने चित्रपट बनू शकला नाही आणि सुशांत हे जग सोडून गेला. त्यामुळे आता माझं त्याच्यासोबत काम करण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.’
मला हे पटतंच नाही; तपास का थांबलाय? सुशांत आत्महत्या प्रकरणी उषा नाडकर्णींचा सवाल