हायलाइट्स:
- राजने केले होते पूर्वाश्रमीची पत्नी कवितावर गंभीर आरोप
- राजच्या बहिणीने देखील त्याच्या आरोपांना दुजोरा
- तीन वर्षातच मोडलं होतं राज आणि कविताचं लग्न
तो दिवस लवकरच यावा अशी इच्छा …आई- वडिलांच्या निधनांतर भुवन बामची भावुक पोस्ट
कविताला मोठी बहीण मानलं पण…
राजने दिलेल्या मुलाखतीत त्याने कवितावर आरोप करत म्हटलं होतं की, त्याच्या आईने कविता आणि रिनाच्या पतीला अनेकदा एकत्र पकडलं होतं. राजने कवितावर लावलेले आरोप खरे असल्याचं सांगत रिनाने म्हटलं, ‘मी कविताला माझी मोठी बहीण मानत होते. मी तिच्यावर बहिणीप्रमाणे प्रेम केलं. माझा तिच्यावर खूप विश्वास होता. आम्ही दोघी एकमेकांच्या जवळ होतो. पण मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती माझ्यासोबत असं काही करेल. ते सगळं खूप अवघड होतं.’
घरातील ड्राइव्हर आणि घरकाम करणाऱ्यांना देखील होता या गोष्टीचा अंदाज
राजने आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, जेव्हाही कविता आणि रीनाचा पती कामानिमित्त बाहेर जात तेव्हा एकमेकांसोबत वेळ घालवत. राजने म्हटलं होतं की, त्याच्या घरातील ड्राइव्हर कविता आणि रिनाच्या पतीमध्ये असलेल्या संबंधांबद्दल बोलत की, त्यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. परंतु, राजने कधीही त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. राज या सगळ्यासाठी कविताला कधीही माफ करणार नसल्याचं त्याने म्हटलं. राजने कवितासोबत २००३ साली लग्न केलं होतं. परंतु, २००६ साली ते वेगळे झाले. त्यानंतर २००९ साली राजने शिल्पासोबत लग्नगाठ बांधली.
मला हे पटतंच नाही; तपास का थांबलाय? सुशांत आत्महत्या प्रकरणी उषा नाडकर्णींचा सवाल