Home मनोरंजन माझ्या रंगावरून लोक वाट्टेल ते…, ‘फॅमिली मॅन २’ च्या प्रियामणीने सांगितला वर्णभेदाचा अनुभव

माझ्या रंगावरून लोक वाट्टेल ते…, ‘फॅमिली मॅन २’ च्या प्रियामणीने सांगितला वर्णभेदाचा अनुभव

0
माझ्या रंगावरून लोक वाट्टेल ते…, ‘फॅमिली मॅन २’ च्या प्रियामणीने सांगितला वर्णभेदाचा अनुभव

[ad_1]

हायलाइट्स:

  • ‘द फॅमिली मॅन २’ मधील प्रियामणीच्या भूमिकेचं होतंय कौतुक
  • प्रियामणीला करावा लागला होता बॉडी शेमिंगचा सामना
  • रंगावरूनही नेटकरी करत होते ट्रोल

मुंबई– बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी आणि सामंथा यांची ‘फॅमिली मॅन २’ ही वेबसीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालते आहे. या वेबसीरिजमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. वेबासरीजमधील सर्व कलाकारांचं सर्वत्र कौतुक होतं आहे. वेबसीरिजमध्ये मनोज बाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियामणी हिचं देखील प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. परंतु, याच प्रियामणीला कधीकाळी प्रेक्षकांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता. युझर्स सोशल मीडियावर प्रियामणीला रंगावरून आणि शरीरावरुन ट्रोल करत होते.

अनिता हसनंदानीचा अभिनय विश्वाला अलविदा, घेतला मोठा निर्णय

करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना
कर्नाटक राज्यात जन्मलेली प्रियामणी अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे. वेबसीरिज प्रदर्शनानंतर दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणीने प्रेक्षकांच्या विचारांबद्दल सांगितलं. २००३ साली तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रियामणीने म्हटलं, ‘मला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला जेव्हा मी चित्रपटात काम करणं सुरू केलं तेव्हा लोक मला जाड म्हणून हिणवायचे. सोशल मीडियावर माझ्या शरीराबद्दल अनेक कमेंट केल्या जायच्या. मला त्या कमेंटने कधीही फरक पडला नाही. कारण, तुम्ही जाड असाल किंवा अगदी स्लिम असाल तरीही युझर्स काहीना काही घाणेरडे कमेंट करणारच. आपण त्यांना नाही अडवू शकत.’


रंगावरूनही बोलायचे नेटकरी
बॉडी शेमिंगप्रमाणे आपल्या रंगवरूनही युझर्स कमेंट करायचे असं सांगत प्रियामणीने म्हटलं, ‘सोशल मीडियावर लोक मला माझ्या रंगावरून वाट्टेल ते बोलायचे. मला अनेकदा काळी म्हटलं गेलं आहे. लोकांना गोऱ्या रंगाच्या अभिनेत्री हव्या असतात. भलेही त्यांना अभिनयातलं काहीच येत नसेल. मी माझा मेकअप नसलेला फोटो पोस्ट केला तर लोकांनी मला काकूबाई देखील म्हटलं आहे. लोकांना त्यांचे विचार बदलायची गरज आहे. अभिनय रंगात नसतो.’ ‘फॅमिली मॅन २’ शिवाय प्रियामणीने मणिरत्नम यांच्या ‘रावण’ चित्रपटातही काम केलं आहे. शिवाय शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील ‘वन टू थ्री फोर’ हे गाणंही प्रचंड गाजलं होतं.

‘२६ जूनला माझं लग्न आहे, मला जाऊ द्या’, सिद्धार्थची मागणी



[ad_2]

Source link