राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याचा झाला अपघात, परिस्थिती अत्यंत नाजूक

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याचा झाला अपघात, परिस्थिती अत्यंत नाजूक
- Advertisement -


बंगळुरू- राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि कन्नड अभिनेता संचारी विजय एका अपघातात मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची तब्येत अजूनही नाजूक आहे. संचारी यांचा भाऊ सिद्धेश कुमार याने रविवारी यासंबंधी माहिती दिली.

शनिवारी अभिनेता बाइकवरून जात होता. मात्र बाइक घसरल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर भावाच्या काळजीत असलेल्या कुमारने प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘अपघातानंतर तो कोमात आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे भरपूरप्रमाणात रक्तही वाहीलं. डॉक्टरांनी ४८ तास फार नाजुक असतील असंही सांगितलं आहे.’

दरम्यान, २०१५ मध्ये ‘नानु अवानल्ला अवालु’ या सिनेमातून संचारी विजय यांनी आपली ओळख निर्माण केली. ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अॅक्ट १९७८ या सिनेमात त्यांना अखेरचे पाहण्यात आले होते.

लॉकडाउनमध्ये विजय यांनी लोकांच्या मदतीसाठीही हात पुढे केला होता. यूसायर या टीमशी जोडून घेत ते करोना संक्रमित लोकांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत होते. ही माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनाही दिली होती.



Source link

- Advertisement -