हायलाइट्स:
- सुपरस्टार अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा आज ७१ वा वाढदिवस
- बॉलिवूड कारकिर्दीपेक्षाही जास्त गाजलं मिथुन यांचं खासगी आयुष्य
- मिथुन यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी गुपचूप लग्न केल्याच्या झाल्या होत्या चर्चा
मिथुन चक्रवर्ती यांनी १९७९ साली अभिनेत्री योगिता बालीशी लग्न केलं होतं. पण नंतर श्रीदेवी यांच्यासाठी त्यांनी योगिता यांना सोडलं. १९८४ मध्ये रिलीज झालेल्या ‘जाग उठा इंसान’ या चित्रपटात श्रीदेवी आणि मिथुन यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवरून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
श्रीदेवी आणि मिथुन यांनी कोणालाही कळू न देता एकमेकांशी गुपचूप लग्न केल्याचं आणि हे लग्न केवळ तीनच वर्ष टिकल्याचं बोललं जातं. अर्थात या दोघांनी या लग्नावर कधीच भाष्य केलं नाही. पण या दोघांचं लग्न झाल्याचं आणि ते पती- पत्नी असल्याची माहिती विकीपिडियावर प्रसिद्ध झाली आणि लोकांनी हेच सत्य असल्याचं मानलं.
मिथुन आणि श्रीदेवी यांच्या लग्नाचं वृत्त योगिता बाली यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आफवा सुद्धा त्याकाळी उडाल्या होत्या. पण एका मुलाखतीत योगिता बाली यांनी ‘मी मिथुन आणि त्यांना दुसऱ्या पत्नीला स्वीकारायला तयार आहे’ असं वक्तव्य करत या अफवांना पूर्णविराम दिला. पण मिथुन आणि श्रीदेवी याचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. आणि अवघ्या तीन वर्षांतच हे दोघंही वेगळे झाले.
जेव्हा श्रीदेवींना खात्री झाली की, मिथुन त्यांची पहिली पत्नी योगिता बाली यांना कधीच घटस्फोट देणार नाहीत. तेव्हा त्यांनी मिथुन यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. १९८८ साली मिथुन आणि श्रीदेवी एकमेकांच्या संमत्तीनं वेगळे झाले. योगिता यांनी जेव्हा मिथुन यांचं तिसरं मुलं नमाशीला जन्म दिला. तेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्व गोष्टी सामान्य झाल्या. तर दुसरीकडे श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा बी- टाऊनमध्ये सुरू झाल्या होत्या.