Home मनोरंजन गँगस्टर नातीला खेळवतो तेव्हा…अरुण गवळीचा फोटो व्हायरल

गँगस्टर नातीला खेळवतो तेव्हा…अरुण गवळीचा फोटो व्हायरल

0
गँगस्टर नातीला खेळवतो तेव्हा…अरुण गवळीचा फोटो व्हायरल

[ad_1]

मुंबई: अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरात गेल्या महिन्यात चिमुकलीचं आगमन झालं. गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली. अक्षय आणि योगिता यांच्या घरी मुलीच्या येण्यानं आनंद द्विगुणित झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून या फोटो अक्षय आणि योगिता यांची लेक आजोबांसोबत म्हणजेच कुख्यात गँगस्टर अरुण गवळीसोबत दिसत आहे.


महाराष्ट्राला आणि त्यातही मुंबईकरांना अरुण गवळी हे नाव माहीत नाही असं होणार नाही. डॅडी नावाने प्रसिद्ध असलेला कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्न केलं होतं. त्यानंतर वर्षानंतर त्यांच्याघरी चिमुकलीचं आगमन झाल्यानंतर सर्वजण खूपच आनंदात आहेत.

योगिता आणि अक्षय यांनी लेकीचं नाव ‘अर्णा’ असं ठेवलं आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अरुण गवळी म्हणजे ‘डॅडी’ नातीला खेळवताना दिसत आहे.

व्हायरल फोटो

बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, याबाबत बोलताना तो म्हणाला, ‘मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकता नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरू करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

दगडी चाळीत योगिता आणि अक्षयचं लग्न आणि इतर समारंभ पार पडले होते. स्वतः अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या लग्नाचे आणि तर समारंभाचे अनेक फोटो शेअर केले होते. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.

[ad_2]

Source link