हायलाइट्स:
- हरलीन सेठी आणि विकी कौशलचे ब्रेकअप का झाले?
- हरलीन विकीच्या ब्रेकअपला कतरिनाच जबाबदार
- ब्रेकअपनंतर हरलीन डिप्रेशनमध्ये होती
हरलीन ही पंजाबी अभिनेत्री आहे. अनेक जाहिराती, वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या हरलीनने जेव्हा विकीला आणि विकीने हरलीनला पाहिले तेव्हा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून गेले. काही दिवसांनी या दोघांनी जाहीरपणे आपल्या नात्याचा स्वीकारही केला होता. परंतु या दोघांचे जेव्हा ब्रेकअप झाले तेव्हा दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला होता. नेमके काय झाले म्हणून या दोघांचे ब्रेअकप झाले, असा विचार प्रत्येकाच्या मनात आला. हे दोघेजण आता वेगळे झाले यावर कुणाचाही विश्वास बसला नाही.
प्रेमाचा स्वीकार खुलेपणाने केला
विकी हा अनेक मुलींसाठी तो ड्रीम बॉय होता. परंतु विकी हरलीनबरोबर रिलेशनमध्ये असल्याचे समजल्यावर हजारो तरुणींना अतीव दुःख झाले होते. अर्थात असे जरी असले तरी या दोघांनीही सोशल मीडियावर तसे कधीच जाहीर केले नाही. त्यामुळेच कॉफी विथ द करण कार्यक्रमात विकीने हरलीनचे नाव न घेता एका सुंदर मुलीसोबत रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले होते.
अशी झाली होती रिलेशनची सुरुवात
हरलीन आणि विकी यांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या प्रेमकथेला सुरुवातही झाली होती. जेव्हा हरलीनला पार्टीमध्ये पाहिले तेव्हा पाहताच क्षणी ती आवडल्याचे खुद्द विकीनेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. हरलीनसोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय केल्याचेही विकीने सांगितले होते.
२०१९ मध्ये झाला ब्रेकअप
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार हरलीन आणि विकी यांचे ब्रेकअप २०१९ च्या आसपास झाले. अर्थात दोघांचे ब्रेकअप का झाले यावर या त्यांनी कधीही जाहीरपणे भाष्य केले नाही. परंतु हरलीनने एका मुलाखतीमध्ये सांगितले, ‘ खरे सांगू तर मी ब्रेकअप झाल्यानंतर मी दुःखी झाले पण मी कधीच त्रासले नाही. कारण मी एका अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये होते.’

कशामुळे झाले ब्रेअकप
हरलीन आणि विकीने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याची कुजबूज सुरू झाली. हे तेव्हा झाले जेव्हा विकी आणि कतरीना यांच्यातील जवळीक वाढू लागल्याच्या बातम्या सातत्याने येऊ लागल्या होत्या. विकीच्या आयुष्यात कतरीना आल्यामुळे हरलीन बरोबरच्या नात्यामध्ये तणाव येऊ लागला. तशा बातम्या देखील येत होत्या. अखेर दोघांमध्ये तणाव निर्माण होऊ लागल्याने हरलीन स्वतःहून त्याच्या आयुष्यातून दूर होण्याचा निर्णय घेतला. कतरीनाच्या येण्यामुळे या दोघांमध्ये तणाव निर्माण होऊ लागल्याच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या.दोघांनीही आपले नाते वाचवण्यासाठी आणि एकमेकांसोबत राहण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते यशस्वी ठरले नाहीत.

ब्रेकअपनंतर डिप्रेस होती हरलीन
विकीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर हरलीन काही दिवस खूपच डिप्रेशनमध्ये होती. एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय हा त्यांनी परस्पर संमतीने घेतला होता. दरम्यान, विकी कौशल सध्या कतरीना कैफला डेट करत आहे. अभिनेता हर्षवर्धन कपूरने देखील या दोघांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. तर हरलीन अजूनही सिंगलच आहे.