Home मनोरंजन ‘मर्द बनो’ संजय दत्तचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल

‘मर्द बनो’ संजय दत्तचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल

0
‘मर्द बनो’  संजय दत्तचा जुना व्हिडीओ व्हायरल;  नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल

[ad_1]

हायलाइट्स:

  • संजय दत्तचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
  • सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे संजयवर याआधीही झाली आहे टीका
  • व्हायरल व्हिडीओमध्ये संजयनं दिलं आहे पुरुषत्त्वावर भाषण

मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि वाद हे समीकरण आता कोणालाच नवीन नाही. संजय दत्त असा अभिनेता आहे ज्यानं आपल्या आयुष्यात चांगले आणि सर्वात वाईट असे सर्व दिवस पाहिलेत. कधी नशेच चुकीचं वक्तव्य केल्यानं तो चर्चेत राहिला तर कधी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे त्याच्या नावाची चर्चा झाली. मुंबईतील झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात तर त्याला तुरुंगवासही झाला. पण आता संजय चर्चेत आहे ते त्याच्या एका जुन्या व्हिडीओमुळे. संजय दत्तचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात त्यानं पुरुषत्त्वावर मोठं भाषण देताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे संजयवर याआधीही टीका झाली आहे.
संजय दत्तनं घेतली करोना लस; डॉक्टरांचे मानले आभार
संजय दत्तनं या व्हिडीओमध्ये जे पुरुष जीममध्ये न जाता आपला वेळ सलूनमध्ये घालवतात अशांवर एक लांबलकच मोनोलॉग म्हटला आहे. हा व्हिडीओ ‘हॅवार्ड ५००’च्या जाहिरातीचा भाग आहे. जो २००८ मध्ये पहिल्यांदा समोर आला होता. या व्हिडीओमध्ये संजय दत्त, छातीवरील केसांचं वॅक्स करणाऱ्या आणि गुलाबी शर्ट घालून फिरणाऱ्या मेट्रो सेक्शुअल लोकांची खिल्ली उडवताना दिसत आहे.

संजय दत्तनं आपल्या व्हिडीओमध्ये या सर्व गोष्टी पुरुषांच्या नाही तर मुलींच्या आहेत असं म्हटलं आहे. तो पुढे म्हणतो, ‘पुरुषांनी दाढी वाढवायला हवी. मळकट जीन्स घालायला हवी आणि सालसा डान्स शिकणं सोडून भांगडा डान्स करायला हवा.’ संजयला या त्याच्या व्हिडीओमुळे बरीच टीका सहन करावी लागली आहे. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अभिमानास्पद! दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’ मिळवणारा पहिला अभिनेता ठरला संजय दत्त
संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा ‘कलंक’ या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत दिसला होता. ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता वरुण धवन, आदित्य राय कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तसेच लॉकडाऊनमध्ये त्याचे ‘तोरबाज’ आणि ‘सड़क २’ हे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले होते. आगामी काळात संजय दत्त ‘केजीएफ: चॅप्टर २’ आणि ‘शमशेरा’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कधीकाळी जिवलग मित्र होते संजय दत्त आणि गोविंदा, एका गैरसमज आणि कायमचा दुरावा

[ad_2]

Source link