Home ताज्या बातम्या वृद्ध महिलेच्या घरी 'ती' पेइंगगेस्ट बनून राहण्यास आली अन्…

वृद्ध महिलेच्या घरी 'ती' पेइंगगेस्ट बनून राहण्यास आली अन्…

0
वृद्ध महिलेच्या घरी 'ती' पेइंगगेस्ट बनून राहण्यास आली अन्…

म. टा. खास प्रतिनिधी
अंधेरी : ज्या घरामध्ये वयोवृद्ध लोक राहतात आणि विशेषतः एकटे वास्तव्य करीत आहेत अशी घरे शोधायची आणि या घरामध्ये पेइंगगेस्ट म्हणून जागा मिळवायची. संधी मिळताच घरातील मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचे. अशा प्रक्रारे घरांची ‘सफाई’ करणाऱ्या बिहारच्या एका शिक्षित तरुणीला अंधेरी पोलिसांनी अटक केली. हीच गुन्हेपद्धत वापरून तिने अनेकांना फसविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अंधेरी येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरी मे महिन्यात रेखा (बदललेले नाव) गेली. आपली ओळख सांगून मुंबईत सध्या एकटीच असून राहण्यासाठी घर नसल्याचे तिने त्या वृद्ध महिलेला सांगितले. घरात एकटीच असल्याने सोबतही होईल आणि पेइंग गेस्टकडून चार पैसेही मिळतील असा विचार करून महिलेने तिला घरी राहण्याची परवानगी दिली. २९ मे रोजी ही महिला पूजा आणि धार्मिक विधींमध्ये मग्न असताना या तरुणीने घरातील दागिने चोरून तिच्या नकळत घरातून पळ काढला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

एकट्या राहणाऱ्या वृद्धांना या तरुणीकडून धोका असल्याने अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय बेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पिसाळ यांच्या पथकाने या तरुणीचा शोध सुरू केला. वृद्ध महिला राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटजेची झाडाझडती घेतली असता ही तरुणी दोन रिक्षा बदलून अंधेरी चारबंगलाच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. रिक्षांचा नंबर काढून रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि चार बंगला परिसरात शोधमोहीम हाती घेत पोलिसांनी रेखाला अटक केली. ही तरुणी पदवीधर असून गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत पेइंग गेस्ट म्हणून राहत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

Source link