[ad_1]
हायलाइट्स:
- अलायाच्या राहत्या घरी होता भुतांचा वावर
- रात्रीचे यायचे चालण्याचे आवाज अन घडायच्या विचित्र घटना
- भुताच्या भीतीने अलायाने परत जाण्यास दिला नकार
अमिताभ बच्चन यांच्या ट्विटमधील ‘त्या’ व्याक्यानं नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अलायाने तिचा सामना एका भुताशी झाल्याचं वक्तव्य केलं आहे. अलायाने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ती न्यूयॉर्कमध्ये ज्या घरात राहते तिथे एक भूतही होतं. घरात अनेकदा चित्र- विचित्र घटना घडायच्या. अलायाला अर्ध्या रात्री कुणाच्यातरी चालण्याचा आवाज यायचा. मध्यरात्री येणाऱ्या पावलांच्या आवाजाने अलायाची झोप उडवली होती. काही वेळा तर बाथरूममधील शॉवर अचानक चालू होत होता. या सगळ्या घटना अनपेक्षित होत्या. घरात घडणाऱ्या घटनांमुळे अलायाची भीती आणखीनच बळावत गेली.
आपला भीतीदायक अनुभव सांगत अलायाने म्हटलं की, एके दिवशी तिने स्वतः त्या भुताचा सामना केला. अलायाने डोळ्यांच्या कोपऱ्यातून भूत पाहिलं होतं जे तिच्या मागे धावत होतं. फक्त अलायाचं नाही तर तिच्या सोबत राहणाऱ्या मैत्रिणीलादेखील असेच अनुभव आले होते. अलायाने जेव्हा तिच्या मैत्रिणीला विचारणा केली तेव्हा तिनेही तिच्या मागे कुणीतरी चालत असल्याचे भास झाल्याचं सांगितलं. त्यानंतर अलायाची खात्री झाली की या घरात काहीतरी विचित्र आहे. आता मात्र भुताच्या भीतीने अलाया पुन्हा न्यूयॉर्कला जाऊ इच्छित नाही. मला न्यूयॉर्कला त्या भुताच्या घरात परत जायचं नाही, असं म्हणत तिने घरी परत जायला नकार दिलाय.
सिनेन्यूजसिनेमागृहांसाठीचे नियम शिथील झाले नाहीत तर बॉलिवूड निर्माते घेणार ‘हा’ मोठा निर्णय
[ad_2]
Source link