हायलाइट्स:
- आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
- करोना संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधत आहेत.
- आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Live अपडेट…
>> हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, पहिल्यांदा देश आणि नंतर प्रादेशिकता- मुख्यमंत्री.
>> शिवसेनेने हिंदुत्वाच्या रुपाने महाराष्ट्रा आणि देशाला आधार दिला- मुख्यमंत्री.
>> स्वबळ हे अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे असायला पाहिजे- मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसचे नाव न घेता टोला.
>> स्वबळावर लढणे हा आमचा हक्क आहे- मुख्यमंत्री.
>> स्वबळाचा नारा हा केवळ निवडणुकीसाठी नसतो, तर तो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी असतो- मुख्यमंत्री.
>> स्वबळा हे केवळ निवडणुकीसाठीच असते असं नाही, स्वबळासाठी स्वत:ची ताकद असावी लागते- मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसचे नाव न घेता टोला.
>> काही जण स्वबळाचा नारा देत आहेत, मग आम्हीही देऊ स्वबळाचा नारा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
>> सत्ता न मिळाल्याने काहींचा जीव कासावीस होत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
>> ५५ व्या वर्षांच्या वाटचालीचे श्रेय सर्व शिवसैनिकांचे आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना संबोधन सुरू.
>> पाहा, शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन…
LIVE : शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा
>> उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रास्ताविकपर भाषण सुरू.
>> थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी साधणार संवाद.
>> शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू.
>> शिवसेना @ ५५; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज काय बोलणार? (क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी)
>> दादर येथील शिवसेना भवनाजवळ भाजप कार्यकर्ते विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष पाहायला मिळाला. याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
>> आजच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>> करोनाचे संकट असल्याने या वर्षी वर्धापन दिनाचा सोहळा व्हच्युअल स्वरुपात साजरा होत आहे.
>> शिवसेनेचा आजचाशिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होत आहे.
>> १९ जून २०२१ या दिवशी शिवसेना या राजकीय पक्षाचा ५५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.