हायलाइट्स:
- मसाबाने शेअर केला नीना यांच्या जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ
- व्हिडीओ शेअर करत मसाबाने आईकडे केली अशी मागणी
- व्हिडीओ पाहून नीना देखील झाल्या आश्चर्यचकीत
नीना गुप्ता यांचा प्रेशक कुकरची जाहिरात करतानाचा एक व्हिडिओ मसाबाने शेअर केला. यात नीना यांनी साडी नेसली असून केसात गजरा माळला आहे. अनेक वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ असल्याने नीना खूपच तरुण आणि आकर्षक दिसत आहेत. ही जाहिरात ८० आणि ९० च्या दशकामध्ये दूरदर्शवरून प्रसारित व्हायची आणि ती खूपच लोकप्रिय देखील झाली होती. ही जाहिरात शेअर करताना मसाबाला हसू आवरलेले नाही. या व्हिडीओसोबत मसाबाने एक धमाल कॅप्शन देत आई नीना गुप्ताला एक विनंती केलीए.
नीना गुप्ता यांनी सांगितलं प्रेग्नन्सीमध्ये लग्न न करण्याचं कारण
हा व्हिडीओ शेअर करत मसाबाने लिहिले आहे, ‘आता पुढच्यावेळी मी जेवायला येईन तेव्हा तुझ्याकडून अशाच परफॉर्मन्सची अपेक्षा आहे आई…’ मसाबाने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून खुद्द नीना देखील आश्चर्यचकीत झाल्या. मसाबाच्या या पोस्टवर नीना यांनी लिहिले, ‘अरे देवा!’
मसाबाच्या या व्हिडीओला युझर्सनी तर पसंती दिलीच आहे, याशिवाय अनेक सेलिब्रिटींनी पसंती दिली आहे. त्यात अभिनेत्री रिचा चढ्ढा, नेहा पेंडसे आणि मिनी माथुरने देखील या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
नीना यांच्या कामाबद्दल सांगायचे तर अलिकडेच ‘सरदार का ग्रँडसन’ या सिनेमात त्या दिसल्या होत्या. या सिनेमात त्यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत सिंग मुख्य भूमिकेत होते. नीना विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गुडबाय’ या सिनेमातही दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना आणि पवेल गुलाटी दिसणार आहेत.