Home मनोरंजन ‘फादर्स डे’ आधी सोनू सूदनं मुलाला भेट दिली महागडी कार, किंमत ऐकूण व्हाल हैराण

‘फादर्स डे’ आधी सोनू सूदनं मुलाला भेट दिली महागडी कार, किंमत ऐकूण व्हाल हैराण

0
‘फादर्स डे’ आधी सोनू सूदनं मुलाला भेट दिली महागडी कार, किंमत ऐकूण व्हाल हैराण

[ad_1]

हायलाइट्स:

  • करोनाच्या काळात सोनू सोदनं अनेक गरजू लोकांना केली आहे मदत
  • सोनू सूदनं मुलाला महागडी कार भेट दिल्याची सुरू आहे चर्चा
  • सोशल मीडियावर व्हायरल होतोय सोनू सूदचा व्हिडीओ

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद मागच्या वर्षभरापासून सातत्यानं चर्चेत आहे. करोना व्हायरसनं देशभरात थैमान घातल्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे सोनू सूद. सोनू सूदनं या वर्षभरात अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. अगदी सुरुवातीच्या काळात प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यापासून ते आता अलिकडच्या काळात रुग्नांना बेड, ऑक्सिजन, औषधं या गोष्टींची सोय करुन देण्यापर्यंत सोनूनं वेगवेगळ्या प्रकारे सर्वांना मदत केली. पण सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोनू सूद सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात त्यानं त्याचा मुलगा इशांतला महागडी कार भेट दिल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या सोनू सूदनं फादर्स डेच्या अगोदर त्याच्या मुलाला ‘मर्सेडीज मेबॅक जीएलएस ६००’ ही महागडी कार भेट दिली आहे. या कारची किंमत ३ कोटीच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार Mercedes Maybach GLS600 मागच्याच आठवड्यात भारतात लॉन्च झाली आहे. सोनू सूदचा एक व्हिडीओ सध्या युट्यूबवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो त्याच्या मुलांना घेऊन टेस्ट ड्राइव्ह घेताना दिसत आहे.

सोनू सूदला महागड्या गाड्यांचं वेड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये याआधीच ऑडी क्यू ७, मर्सेडीज बेंज एमएल क्लास आणि पार्श पानामेरा या कार्सचा समावेश आहे. सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचे एका मागोमाग एक असे ४ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ज्यात ‘पृथ्वीराज’, ‘अल्लुडु अधूर्स’, ‘आचार्य’ आणि ‘थमिलारासन’ यांचा समावेश आहे.

दरम्यान करोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोनू सूदनं सातत्यानं गरजू लोकांची मदत केली आहे. पण काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयानं करोनाच्या औषधांची खरेदी आणि पुरवठा या संदर्भात सोनू सूद आणि काँग्रेस नेता जीशन सिद्दीकी यांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. कोरनाच्या काळात यांनी लोकांसमोर स्वतःला देवदूत दाखवल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे.

[ad_2]

Source link