Home मनोरंजन वर्ल्ड फादर्स डे: पडद्यावर ‘बाप’माणसाची भूमिका साकारताना काय वाटतं? कलाकार म्हणतात…

वर्ल्ड फादर्स डे: पडद्यावर ‘बाप’माणसाची भूमिका साकारताना काय वाटतं? कलाकार म्हणतात…

0
वर्ल्ड फादर्स डे: पडद्यावर  ‘बाप’माणसाची भूमिका साकारताना काय वाटतं? कलाकार म्हणतात…

[ad_1]

हायलाइट्स:

  • आज ‘वर्ल्ड फादर्स डे’
  • पडद्यावर बाबाची भूमिका साकारणारे कलाकार
  • आजच्या ‘वर्ल्ड फादर्स डे’ निमित्त झालेल्या गप्पा

नव्या विचारांची व्यक्तिरेखा
घरातील महिलांची कामं पुरूषांनी स्वेच्छेने सांभाळावी हा एक नवीन विचार आम्ही ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेतून रुजवू पाहतोय. त्यातील सासरे कम वडील ही भूमिका मला खूप आवडते. धीर देणारे, समजावून सांगणारे, हिंमत देणारे शुभ्राचे वडील साकारताना मला खूप आनंद मिळतोय. हिंदी चित्रपटांमधील ‘शक्ती’मधले दिलीप कुमार, ‘शोले’मधले संजीव कुमार यांच्या वडिलांच्या भूमिका मला खूप भावल्या होत्या. त्याचबरोबर मराठीमध्ये ‘सूर्यास्त’ नाटकातील निळू फुले आणि ‘पर्याय’ नाटकातील चंद्रकांत गोखले यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिका माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.
डॉ. गिरीश ओक

आकर्षक भूमिका
मी साकारलेली ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतील श्यामराव परांजपे ही भूमिका आकर्षक होती. तिला रसिकांनीही खूप छान प्रतिसाद दिला होता. आत्ता सुरू असलेल्या ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेतील माझी वडीलांची भूमिका जरा ग्रे शेडची आहे. एक नट म्हणून ही भूमिका वेगळी आणि आव्हानात्मक असल्याने मला आवडतेय. वडिलांच्या भूमिकेसाठी माझ्यावर बलराज सहानी यांच्या अभिनयाचा प्रभाव आहे. त्यांनी साकारलेले वडील, त्यांचा आवाज, मुलांना समजावून सांगण्याची पद्धत विलक्षण असायची. त्यांच्या सगळ्या भूमिकांमधून ते तंतोतंत वडील साकारायचे.
– प्रदीप वेलणकर

श्रेय विक्रम काकांना
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्या सेटवर रोहन गुर्जर आणि तेजश्री प्रधानबरोबर मी खूप धमाल केली होती. त्या मालिकेतील माझी वडिलांची भूमिका लोकप्रिय झाली होती. ‘कालाय तस्मै नम:’ या मालिकेमध्ये विक्रम गोखले माझ्या वडिलांच्या भूमिकेत होते आणि मी शशांत केतकरच्या वडिलांच्या भूमिकेत होतो. पण विक्रम काकांनी साकारलेली भूमिका खूप काही शिकवून गेली. त्यावर्षी मला ‘मटा सन्मान’ मिळाला होता. मी त्याचं सगळं श्रेय विक्रम काकांना दिलं होतं.
मनोज कोल्हटकर

अनेक पैलूंचा अभ्यास
‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत मी साकारलेल्या छत्रपती शहाजी महाराजांची भूमिका माझ्या मनात बसलेली आहे. आदर्श वडिलांचे अनेक पैलू या भूमिकेमुळे मला अभ्यासता आणि अंगिकारता आले. बलराज सहानी मला ‘वक्त’ चित्रपटातील वडिलांच्या भूमिकेत खूप आवडतात. त्याचबरोबर आमच्या ‘मुक्ता’ चित्रपटात डॉ. श्रीराम लागू यांनी जे बाबा साकारले होते ते विलक्षण होते. त्यांनी साकारलेली आबा ही व्यक्तिरेखा आजही लक्षात आहे.
– अविनाश नारकर

हळवा कोपरा
मी साकारलेली ‘वादळवाट’ मालिकेमधील आबासाहेब चौधरी ही व्यक्तिरेखा मला खूप आवडते. कारण त्याच्यामध्ये कणखर वडिलांबरोबरच त्यापलीकडचा हळवेपणा होता आणि ती खऱ्या अर्थाने वडीलांचं नातं जपणारी व्यक्तिरेखा होती. त्याचबरोबर मला अमिताभ बच्चन यांचा ‘पिकू’ या चित्रपटातील बाबा खूप आवडतो. कारण त्या वयातली ती विशिष्ट जडणघडण, मानसिकता त्यांनी सुंदर जमवली आहे. कुरकुर, कटकट करत असणारा बाबा असला तरी मुलीसाठी असणारा एक हळवा कोपरा त्यांनी छान जपला आहे.
– अरुण नलावडे

संकलन : गौरी भिडे

[ad_2]

Source link