हायलाइट्स:
- सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते सारा
- सोशल मीडियावर सध्या होतेय साराच्या थ्रोबॅक फोटोची चर्चा
- थ्रोबॅक फोटो शेअर करत सारानं तिच्या चाहत्याना दिलंय चॅलेज
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या सारानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रमा स्टोरीवर तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिला ओळखणं कठीण आहे. कारण हा फोटो ती शाळेत शिकत असतानाचा आहे . हा फोटो शेअर करताना सारानं चाहत्यांना या फोटोमध्ये तिला ओळखून दाखवण्याचं चॅलेंज केलं आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये सारा अली खानसोबत तिच्या शाळेत इतर विद्यार्थी देखील दिसत आहे. तसेच त्यांच्या मागे काही महिला बसलेल्या दिसत आहेत. सारा हा फोटो कुठला आहे हे सांगितलं नसलं तरीही फोटो पाहून कोणीही सांगेल की हा फोटो तिच्या शाळेच्या दिवसांतील आहे आणि यात सर्वात खालच्या रांगेत छोटी सारा उजव्या कोपऱ्यात बसलेली दिसत आहे.
काही दिवसापूर्वीच सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. ज्यात ती तिच्या मैत्रिणींसोबत पूल साइडला एन्जॉय करताना दिसली होती. आपल्या मैत्रिणीसोबतचे हे फोटो शेअर करताना सारानं याला ‘लव्ह इज इन द एअर’ असं कॅप्शन दिलं होतं.
साराच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ती आदित्य धरच्या ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.