Home मनोरंजन पाऊस आणि विराट कोहलीची मॅच, पण अनुष्का मात्र इंग्लंडमध्ये एन्जॉय करतेय समोसा पार्टी

पाऊस आणि विराट कोहलीची मॅच, पण अनुष्का मात्र इंग्लंडमध्ये एन्जॉय करतेय समोसा पार्टी

0
पाऊस आणि विराट कोहलीची मॅच, पण अनुष्का मात्र इंग्लंडमध्ये एन्जॉय करतेय समोसा पार्टी

[ad_1]

हायलाइट्स:

  • अभिनेत्री अनुष्का शर्मा बऱ्याच काळ बॉलिवूडपासून आहे दूर
  • बॉलिवूडपासून दूर असूनही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते अनुष्का
  • सध्या पती विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये टीम इंडियाला चिअरअप करतेय अनुष्का शर्मा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चित्रपटांमध्ये दिसत नसली तरीही सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर अनुष्का बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती नेहमीच तिचे अपडेट देताना दिसते. सध्या ती पती विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये टीम इंडिया यावेळी न्यूझीलंडसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळत आहे. पण अशात अनुष्का मात्र सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.
Photos- कॅमेरे पाहून अनुष्काने मुलीला छातीशी कवटाळलं, चाहत्यांनी फोटोग्राफर्सवर काढला राग
भारतीय टीम न्यूझीलंडसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळत असताना पाऊस आणि प्रकाशाच्या कमतरतेमुळे सामन्यात व्यत्यय येत आहे. असं असताना अनुष्का मात्र तिथे इंडियन स्नॅक्स एन्जॉय करत आहे. अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर समोसे आणि लाल चटणी यांनी भरलेल्या प्लेटचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, ‘जेव्हा कमी प्रकाश तुमच्यासाठी समोसे आणतो.’ इंग्लंडमधील पाऊस, कमी असलेला प्रकाश आणि अशा वातावरणातली मॅच सुरू असताना अनुष्का मात्र समोसा पार्टी एन्जॉय करत आहे. तिच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

AssignmentImage-1975044301-1624176485

Video: विराटपासून दूर असलेल्या अनुष्काने शेअर केल्या त्याच्यासोबतच्या वर्षभराच्या खास आठवणी

अनुष्का शर्मानं याआधीही इंग्लंडमधून अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या अनुष्का मुलगी वामिकासोबत टीम इंडियाला चिअरअप करत आहे. अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्यासोबत २०१८ साली रिलीज झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्कानं अद्याप कोणताही चित्रपट साइन केलेला नाही. सध्या ती मुलगी वामिकासोबत आपलं आईपण अनुभवत आहे.

‘विरुष्का’नं चाहत्यांचे मानले आभार, करोना फंडासाठी लक्ष्यापेक्षा जमा झाली अधिक रक्कम!



[ad_2]

Source link