हायलाइट्स:
- इंडियन आयडल १२ मधून सवाई भट्ट एलिमिनेट
- अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
- सवाई भट्टच्या गाण्याची चाहती आहे ही व्यक्ती
आताही कार्यक्रमातून सवाई बाहेर गेल्यामुळे नव्याला खूपच वाईट वाटले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सवाईचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत दुःखी इमोजी आणि हार्ट ब्रेकचा इमोजी पोस्ट केला आहे. त्यासोबत तिने सवाईला पाठिंबा देत लिहिले की, ‘ गात रहा आणि चमकत रहा…’ नव्याने पाठिंबा दिल्यामुळे सवाईला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
सवाईच्या गाण्याचे नव्याने अनेकवेळा भरभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्याचे फोटो शेअर केले होते. सवाई भट आणि उदित नारायण यांच्यासोबत गातानाचा फोटो नव्याने शेअर केला होता. त्यावेळी त्याचे भरभरून कौतुकही केले होते. सवाईने सादर केलेल्या ‘उड जा काले कांवा’ हे गाणे नव्याला खूपच आवडले होते. त्याचे हे गाणे ऐकून नव्या खूपच भारावून गेली होती.
दरम्यान, इंडियन आयडल १२ या स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर सवाईने त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे. तो म्हणाला, ‘नमस्कार, आपण सर्वजण हिमेश सरांच्या गाण्यांचा आनंद घेतो. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करा ते नेहमीच आनंदित राहतील आणि तशीच प्रार्थना माझ्यासाठी देखील करा. तुम्ही जेवढे प्रेम करता त्यात खूप आशीर्वाद असतात…’