[ad_1]
युझरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना अनुराग म्हणाला, ‘सर्वात आधी मी तिला विचारेन की, तिला हे बाळ हवं आहे आणि त्यानंतर तिचा जो निर्णय असेल त्यात मी तिच्या सोबत असेन. मी तिला ती जशी असेल तशी स्वीकारेन आणि तिला जे करायचं असेल किंवा त्या बाळाबाबत जो निर्णय घ्यायचा असेल त्यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन.’
या व्हिडीओमध्ये अनुराग सांगतो, ‘आजच्या काळातील मुलं खूपच व्यक्त होणारी आणि स्पष्टपणे बोलणारी आहेत. पण माझ्या काळात असं नव्हतं आमच्याकडे असं काही बोलण्याची हिंमतही नव्हती. त्यामुळे पालकांनी मुलांवर आपले निर्णय लादणं बंद करायला हवं’ याच व्हिडीओमध्ये अनुरागला मुलीचा बॉयफ्रेंड कसा वाटतो असाही प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर देताना तो म्हणाला, ‘तो एक चांगला मुलगा आहे. मला तो आवडतो कारण तो आध्यामिक आहे.’ अनुरागचं बोलणं ऐकून मुलगी आलिया खूश झालेली पाहायला मिळते.
अनुराग कश्यपची मुलगी तिच्या शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये असते. ती जवळपास १० महिन्यांनंतर भारतात परतली आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही भारतात आला आहे. तिनं तिच्या सोशल मीडियावर न्यूयॉर्क ते भारत प्रवासाचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. यासोबतच ती अनेकदा बॉयफ्रेंडसोबतचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते.
[ad_2]
Source link