हायलाइट्स:
- सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते पूनम पांडे
- मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत पूनम पांडे प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा
- प्रेग्नन्सीच्या चर्चांवर पूनम पांडेनं सोडलं मौन
पूनम पांडेच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा होत असतानाच पूनमनं यावर प्रतिक्रिया देत या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच जबरदस्तीनं मी प्रेग्नन्ट असल्याच्या अफवा पसरवू नका असंही तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आणि या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पूनम पांडे म्हणाली, ‘माझं आयुष्य एका उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे आहे. मी प्रेग्नन्ट असेन कर मी आनंदाने याची घोषणा करेन. कोणत्याही स्त्रीसाठी ही एक आनंदाची गोष्ट असते. पण माझ्यासाठी असं नाहीये कारण मी प्रेग्नन्ट नाहीये. कोणत्याही गोष्टीवर विश्वास करण्याआधी आणि त्याची चर्चा करण्याआधी ती खरी आहे किंवा नाही याची खात्री केली गेली पाहिजे. मी खरंच प्रेग्नन्ट असे तर मिठाई वाटून सर्वांसोबत ही बातमी शेअर करेन.’
दरम्यान पूनम पांडेनं जुलै २०२० रोजी तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी साखरपुडा उरकला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२० रोजी तिनं कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वांद्रे येथे लग्न केलं होतं. लग्नानंतर सोशल मीडियावर तिनं याची माहिती दिली होती.

























WhatsApp