सोनू सूद आणि त्याचे फाउंडेशन यांना टॅग करत ‘इंजिनिअरिंग बॉय’ नावाच्या ट्विटर प्रोफाइलवरून अभिनेत्याला मेसेज करण्यात आला की, ‘भाऊ माझी मैत्रीण आयफोन मागत आहे, त्याचं काही होऊ शकते का?’ सोनू सूदनेही या यूझरला एक मजेशीर प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालं. सोनूने उत्तर देताना लिहिले की, ‘तिचं तर माहीत नाही, पण जर आयफोन दिलास तर तुझं काही शिल्लक राहणार नाही.’ यावर सोनूने स्माइलीवाले इमोजीही शेअर केले.
सोनू सूद आणि झीशान सिद्दीकी यांची चौकशी केली जाईल
करोना महामारीत उपलब्ध करून दिलेल्या औषधांबाबत चौकशी करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे आदेश उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एसपी देशमुख आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिले आहेत. यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात सोनू सूदसह स्थानिक कॉंग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांची चौकशी करण्यास सांगितले आहे.