Home मनोरंजन Indian Idol 12: ‘किशोरदांना मृत्यूची चाहूल आधीच लागली होती’, ज्येष्ठ संगीतकार आनंदजी झाले भावुक

Indian Idol 12: ‘किशोरदांना मृत्यूची चाहूल आधीच लागली होती’, ज्येष्ठ संगीतकार आनंदजी झाले भावुक

0
Indian Idol 12: ‘किशोरदांना मृत्यूची चाहूल आधीच लागली होती’, ज्येष्ठ संगीतकार आनंदजी झाले भावुक

[ad_1]

हायलाइट्स:

  • ज्येष्ठ संगीतकार आनंदजींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
  • किशोरदा आणि राजेश खन्नांच्या आठवणींनी आनंदजी झाले भावुक
  • दोघांबरोबर आनंदजींचे होते आत्मियतेचे संबंध

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये इंडियन आयडल १२ चा समावेश होते. या कार्यक्रमाचा नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजीमधील आनंदजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमातील स्पर्धकांनी सादर केलेली गाणी ऐकून परीक्षकांसह आनंदजी यांनी ही सर्वांचे भरभरून कौतुक केले. याशिवाय आनंदजी यांनी सुपरस्टार राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांना मृत्यूची चाहूल आधीच लागली होती, अशी एक आठवण आनंदजी यांनी सांगितल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

AssignmentImage-758723573-1624344563


काय म्हणाले आनंदजी

आनंदजी यांनी किशोर कुमार यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘एकदा आम्ही दोघेजण गाडीमध्ये बसलो होतो. तेव्हा किशोरजींनी काळा कुर्ता आणि काळ्याच रंगाची धोती नेसली होती. तेव्हा मी त्यांना या रंगाचे कपडे घालण्यामागचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, अरे कपड्यांचे काय विचारतोस… आपल्याला गाणे गायला जायचे आहे. घरी परत येताना किशोरदा यांनी सांगितले, आनंदजी मी आयुष्याकडून खूप काही शिकलो आहे. आयुष्याचा काहीच भरोसा नसतो. कधीही काहीही होऊ शकते. मला वाटले ते नेहमीसारखेच बोलत आहेत. परंतु ते पुढे म्हणाले, मला आतून जाणवते आहे की आता माझा अंत जवळ आला आहे. त्यावर मी त्यांना विचारले तुम्हाला काय झाले आहे. त्याचे उत्तर देताना किशोरदांनी सांगितले काही होण्याची गरज नाही. आतापर्यंत मी काय काय केले आहे ते तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो आहे.’


कार्यक्रमात आनंदजींनी पुढे सांगितले, ‘किशोरदा यांनी सांगितले की मी तीन गाणी तयार करून ठेवली आहेत. ‘ रोते हुए जाते हैं सब’, ‘जिंदगी तो बेवफा है ‘ याबरोबरच आणखी एक गाणे होते… माझ्यावर अंत्यसंस्कार मुंबईत नाही तर खंडवा येथेच करा. मला वाटले ते असेच नेहमीसारखे गप्पा मारत आहेत. १५-२० दिवसांनंतर बप्पी लहरी यांच्यासाठी त्यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग केले आणि त्यानंतर त्यांचे निधन झाले… त्यानंतर त्यांच्यावर खंडवा येथे जाऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.’


आनंदजी यांनी सांगितले, किशोरदा यांची विनोदबुद्धी अतिशय तल्लख होती. माझ्याशी जेव्हा ते बोलत होते तेव्हा ते अतिशय सहजतेने बोलत होते. ते हसत हसत मला म्हणाले मी जाईन तेव्हा सगळेजण रडत असतील आणि माश्या उडत असतील. ते जे बोलले तसेच घडले…’ किशोर कुमार हे जसे उत्तम गायक होते, तसेच ते उत्तम अभिनेताही होते. त्यांचे १३ ऑक्टोबर १९८७ रोजी निधन झाले.

AssignmentImage-528692268-1624344564

राजेश खन्ना एक उमदे व्यक्तिमत्व

याच कार्यक्रात आनंदजी यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याही आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले, ‘राजेश खन्ना आणि मी अनेक वर्षे एकाच बिल्डिंगमध्ये रहात होतो. ते अतिशय शांत स्वभावाचे होते. परंतु त्यांचे राहणीमान अतिशय स्टायलिश होते. मी जेव्हा त्यांना विचारले तुम्ही अभिनेता बनू इच्छिता का तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जर मला संधी मिळाली तर नक्कीच मला अभिनेता व्हायला आवडेल.’ आनंदजी पुढे म्हणाले, ‘आपल्याल सगळ्यांनाच माहिती आहे की राजेशजींनी केवळ लोकप्रिय सिनेमांतच काम केले नाही तर अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते. मी देखील राजेशजींसोबत अनेक सिनेमांसाठी काम केले आहे. त्यांच्यासाठी गाण्यांना संगीतही दिले आहे. ते व्यक्ती म्हणून खूपच छान होते. त्यांचे आणि माझे खूप आत्मियतेचे संबंध होते.’

दरम्यान, श्रोत्यांनी केलेल्या मागणीवरून आनंदजी यांना पुन्हा या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी स्पर्धकांनी गायलेली सर्व गाणी त्यांना खूप आवडली. कार्यक्रमाच्या याच भागामध्ये सवाई भट्ट याचे एलिमिनेशन झाले.



[ad_2]

Source link