[ad_1]
हायलाइट्स:
- बाबिल खान नेहमीच शेअर करत असतो इरफान खान यांच्या आठवणी
- बाबिल खाननं नुकतेच शेअर केलेले इरफान खान यांचे फोटो चर्चेत
- सोशल मीडियावर व्हायरल होतोय बाबिलसोबतचा इरफान यांचा फोटो
बाबिलनं त्याच्या इस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात इरफान खान दिसत आहे. यातील पहिल्या फोटोमध्ये इरफान खान आणि अनुराग कश्यप बेडवर झोपून काहीतरी गप्पा मारत असल्याचं दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये इरफान एका बछड्यासोबत दिसत आहे आणि तिसऱ्या फोटोमध्ये ते मुलगा बाबिलसोबत सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना बाबिलनं लिहिलं, ‘मी एवढी मेहनत करत आहे. पण याची साक्ष म्हणून तुम्ही आज असायला हवं होतं.’
बाबिलच्या या फोटोवर कमेंट करताना एका युझरनं इरफान खान यांच्या हातात दिसत असलेल्या सिगारेटबद्दल विचारलं, ‘तो जॉइन्ट होता का?’ युझरच्या या प्रश्नानंतर इंटरनेटवर जास्त चर्चा रंगू नये याची काळजी घेत बाबिलनं त्याला लगेच रिप्लाय दिला. त्यानं लिहिलं, ‘मला नाही माहीत तुम्हाला जॉइन्ट कुठे दिसला. पण तुमची अशीच इच्छा असेल तर शुभेच्छा. इथे कोणताही जॉइन्ट नाहीये मित्रा.’
दरम्यान अभिनेता इरफान खान यांचं २९ एप्रिल २०२० रोजी निधन झालं होतं. ते दोन वर्ष न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर या आजाराशी लढत होते. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता. वडिलांच्या निधनानंतर बाबिल सातत्यानं त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. बाबिल लवकरच ‘काला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात बाबिलसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
[ad_2]
Source link