हायलाइट्स:
- मुंबईत गेल्या २४ तासांत २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
- नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी.
- अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांपर्यंत आली खाली.
वाचा: राज्यात तिसरी लाट कशी रोखणार?; सरकारने केल्या ‘या’ ८ महत्त्वाच्या सूचना
मुंबईसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता १० हजारांपर्यंत खाली आली आहे. सध्या मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाच्या १० हजार ४३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून ९५ टक्क्यांवरच असून कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७१३ दिवसांवर गेला आहे.
वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पुण्यातील निर्बंधांबाबत झाला मोठा निर्णय
मुंबईत गुरुवारी नवीन बाधितांच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. शुक्रवारच्या आकडेवारीतही त्यात फारसा फरक दिसला नाही. दिवसभरात ६९३ नवीन रुग्णांची भर पडली तर ५७५ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ९२ हजार २४५ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. मुंबईत आज ३० हजार ८९८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. शहर आणि उपनगरातील चाळी व झोपडपट्ट्यांमधील सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या आता ९ पर्यंत खाली आली आहे. पाचपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या ९२ इमारती सध्या सील करण्यात आलेल्या आहेत.
वाचा: महाविकास आघाडीत धुसफूस; कोल्हापूर ‘झेडपी’त राजकारण तापलं
शुक्रवार संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासात बाधित रुग्ण – ६९३
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५७५
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९२२४५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १०४३७
रुग्ण दुप्पटीचा कालावधी- ७१३ दिवस
कोविड वाढीचा दर ( १८ जून ते २४ जून)- ०.०९ %
वाचा:काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी?; दिल्लीतील बैठकीवर पवार बोलले