सर्वांना आपलीशी वाटणारी गोकुळधाम सोसायटी
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका ही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी रिलेट करणारी आहे. त्यामुळे ही मालिका खूपच लोकप्रिय झाली. या मालिकेमध्ये मुंबईतील गोकुळधाम सोसायटी, त्यामध्ये राहणारी वेगवेगळ्या स्वभावाचे लोक, त्यांच्यातील प्रेम, त्यांच्यातील वादावादी, त्याचप्रमाणे एकमेकांच्या संकटांमध्ये धावून जाणारे हे सारे काही या मालिकेत दाखवले आहेत. या मालिकेतील ही सर्व पात्रे, वातावरण प्रेक्षकांना आपली वाटतात.
कायम अडचणींमध्ये अडकलेले जेठालाल
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दिलीप जोशी हे जेठालालची भूमिका साकारत आहेत. जेठालाल हे व्यापारी आहेत. मात्र त्यांच्या स्वभावामुळे ते कायम अडचणींमध्ये अडकतात. जेठालाल ज्या अडचणींमध्ये अडकतात आणि त्यातून ते बाहेर पडण्यासाठी जी धडपड करतात ते पाहून चाहत्यांना त्यांचे हसू आवरत नाही.