Maharashtra Covid Vaccination: एका दिवसात सात लाखांवर नागरिक लसवंत!; महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी

Maharashtra Covid Vaccination: एका दिवसात सात लाखांवर नागरिक लसवंत!; महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी
- Advertisement -

हायलाइट्स:

  • लसीकरणात महाराष्ट्राने गाठला आतापर्यंतचा उच्चांक
  • दिवसभरात ७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण.
  • राज्याने कालच पार केला तीन लाख लसमात्रांचा टप्पा.

मुंबई:करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सात वाजेपर्यंत ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. ( Maharashtra Covid Vaccination Drive Update )

वाचा:राज्यात आज करोनामुक्त घटले; नवीन बाधित वाढले; ‘ही’ आहे ताजी स्थिती

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. शुक्रवारी राज्याने ३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात ७ लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

वाचा: ‘या’ जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण; निर्बंधांबाबत उचललं ‘हे’ कठोर पाऊल

दरम्यान, योग दिनापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात लसीकरण धोरण बदलण्यात आले आहे. नव्या धोरणानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून मोफत लस देण्यात येत आहे. त्यानुसार देशातील सर्वच राज्यांत लसीकरणाचा वेग वाढला आहे. गेल्या सहा दिवसांत देशात तब्बल ३.७७ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या अनुषंगाने आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाचा वाढलेला वेग ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करत याच पद्धतीने युद्धपातळीवर लसीकरण मोहीम पुढे न्यावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.

वाचा: ‘आकडेवारी लपवली त्या राज्यांत मृतदेह गंगाकिनारी साचले’

Source link

- Advertisement -