मुंबई: सध्या मनोरंजन क्षेत्रात वेब सीरिजचे वारे वाहत आहेत. फक्त हिंदीच नव्हे तर मराठी वेब सीरिजच्या चर्चाही आता सोशल मीडियावर होताना दिसतात. अभिनेता संतोष जुवेकर याच्या आगामी ‘हिडन’ या वेब सीरिजचंही पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आलं आहे.
‘हिडन’मधील भूमिकेविषयी बोलताना संतोष सांगतो की, ‘माझी ‘हिडन’मध्ये अत्यंत वेगळी भूमिका आहे. यात मी एसीपी प्रदीप राजे ही भूमिका साकारत आहे. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक आहे. प्रचंड मेहनत घेऊन आमच्या टीमने ही वेब सिरीज तयार केली आहे.

- Advertisement -