हायलाइट्स:
- पडळकरांची संजय राऊतांवर विखारी टीका
- सामना अग्रलेखावरून केला गंभीर आरोप
- धनगर आरक्षण प्रश्नाबाबतही दिलं उत्तर
‘बिनबुडाचा लोटा संजय राऊत खातो सेनेची व जागतो पवारांना…अशा भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही. धनगरांसाठीच्या योजनेतील १ हजार कोटी सुद्धा तुझ्या मालकाने अडवून ठेवले आहेत,’ असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
अजित पवारांवर कुरघोडी करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असल्याचा आरोप
गोपीचंद पडळकर हे अनेकदा पवार कुटुंबावर विखारी टीका करत असल्याचं दिसतं. आता पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसंच शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊत हे अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही पडळकर यांनी केला आहे.
‘काकांच्या सांगण्यावरून अग्रलेखात अविनाश भोसले हे किती अजित पवारांच्या जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुतण्याच्या मागे फटाके लावायचे काम करतोय,’ अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
दरम्यान, संजय राऊत हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. मात्र भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी खरमरीत शब्दांत टीका करत राऊत यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात पडळकर यांच्या या टीकेला संजय राऊत कसं उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.