[ad_1]
हायलाइट्स:
- विकी कौशलने कतरिना विचारले लग्नाबद्दल…
- या दोघांमधील संवाद ऐकून सलमानने दिली अशी प्रतिक्रिया
- विकी आणि कतरिनाचा जुना व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमाच्या स्टेजवर विकी कतरिनाला विचारतो, ‘सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. तर मग तू लग्न का नाही करत? मला असे वाटते की सगळीकडे लग्नाचा माहौल आहे, ते पाहून तुला देखील लग्न करावेसे वाटत असेल, म्हणून मी तुला विचारले.’ विकीच्या या बोलण्यानंतर कतरिनाही लाजून हसू लागते. तर दुसरीकडे प्रेक्षकांमध्ये बसलेला सलमान त्यांचे हे बोलणे ऐकून हसू लागतो. मग विकी गाणे गात कतरिनाला विचारतो, ‘मुझसे शादी करोगी?’ त्यानंतर सलमान त्याच्या बाजूला बसलेल्या अर्पिताच्या खांद्यावर डोके ठेवतो आणि डोळे बंद करून घेतो. हे पाहून कतरिना म्हणते, ‘हिंमत नाहीए ‘ त्यानंतर सलमान डोळे उघडतो आणि सरळ बसतो.
तर आणखी एका व्हिडीओमध्ये स्टेजवर विकी, कतरिना आणि कार्तिक आर्यन उभे असलेले दिसतात. त्या व्हिडीओमध्ये विकी कतरिनासोबत ‘कमली कमली’ या गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. विकी त्यानंतर कतरिना त्याच्या उरी सिनेमातील ‘ हाऊज द जोश ‘ हा डायलॉग म्हणतो, त्यावर कतरिना म्हणते, ‘हाय सर…’ सध्या कतरिना आणि विकी यांच्यात खूपच जवळीक निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.
[ad_2]
Source link