अर्जुन कपूरने फोटो शेअर करत म्हटलं- ‘मला सुंदर दाखवणं मलायकालाच जमतं’

अर्जुन कपूरने फोटो शेअर करत म्हटलं- ‘मला सुंदर दाखवणं मलायकालाच जमतं’
- Advertisement -


मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याचा २६ जून रोजी ३६ वर्षांचा झाला. यावेळी सर्व चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अर्जुनची गर्लफ्रेंड मलाइका अरोरा हिनेही अर्जुनसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता अर्जुनने स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो काहीतरी विचार करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने वाढदिवसाला तो आणि मलायका दुपारच्या जेवणाला बाहेर गेल्याचंही सांगितलं.

अर्जुन कपूरसाठी खास ठरला वाढदिवस, मलायकाने दिल्या हटके शुभेच्छा


अर्जुन कपूरने पुढे लिहिलं की, ‘स त्या सर्वांचाच स्वीकार करतो जे माझ्या जवळचे आहेत. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांनी मला साथ दिली आणि माझी काळजी घेतली. माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल माझे कामाचे सहकारी, चाहते, मित्र, कुटुंब आणि माझी लाडकी मलायकाचे आभार.’ हा फोटो मलायका अरोराने क्लिक केल्याचेही अर्जुन कपूरने या पोस्टमध्ये सांगितले. एवढंच नाही तर मलायका त्याला नेहमीच सुंदर दाखवते असेही त्याने यावेळी नमूद केले.


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही बहुतेक वेळेस आउटिंग आणि पार्टीत एकमेकांशी दिसतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी आपलं नातं लपवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. तथापि, या दोघांनी याबद्दल कधीही उघडपणे बोलले नाही.

‘कधी मलायकासोबत काम करशील का?’ अर्जुन कपूरनं केला मोठा खुलासा





Source link

- Advertisement -