Home मनोरंजन युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या डॉक्युमेंट्रीला एमी पुरस्कार, मिशेल ओबामांनी केलं कौतुक

युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या डॉक्युमेंट्रीला एमी पुरस्कार, मिशेल ओबामांनी केलं कौतुक

0
युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या डॉक्युमेंट्रीला एमी पुरस्कार, मिशेल ओबामांनी केलं कौतुक

[ad_1]

हायलाइट्स:

  • युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ या डॉक्युमेंट्रीला डेटाईम एमी अॅवॉर्ड
  • ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ या डॉक्युमेंट्रीमध्ये मिशेल ओबामा यांचाही सहभाग
  • प्राजक्ताने मानले मिशेल ओबामा यांचे आभार

मुंबई : प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिच्या ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ या डॉक्युमेंट्रीला डेटाइम एमी अॅवॉर्ड हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये प्राजक्तासोबत अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा सहभागी झाल्या होत्या. या दोघींसह या डॉक्युमेंट्रीमध्ये लिजा कोशी, थेम्बे महलाबा या देखील होत्या. अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार मिळाल्याने प्राजक्ता खूपच आनंदी असून तिने मिशेल ओबामा यांचे आभार मानले आहे. जागतिक पातळीवर जाण्याची संधी मिळाली तिथे मत व्यक्त करता आल्याबद्दल प्राजक्ताने मिशेल ओबामा यांचे मनापासून आभार मानले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने सांगितले, ‘आमच्या ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ या डॉक्युमेंट्रीला डेटाईम एमी पुरस्कार मिळाला आहे. या बातमीवर अजूनही माझा विश्वास बसत नाहीए. माझ्यासारख्या क्रिएटर्सला जागतिक पातळीवर संधी दिल्याबद्दल युट्यूबचे खूप खूप आभार.’

AssignmentImage-1343791679-1624955091


मिशेल यांचेही मानले आभार
प्राजक्ताने या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘ मिशेल ओबामा यांची मनापासून आभारी आहे. त्यांनी या प्रोजेक्टमध्ये मला सहभागी करून घेतले. त्याचप्रमाणे लिजा आणि थेम्बे यांचेही खूप खूप आभार. हा अनुभव माझ्यासाठी खूपच रोमांचकारी आहे.’


नॉन फिक्शन स्पेशलमध्ये मिळाले अॅवॉर्ड

डेटाईम एमी अॅवॉर्डमध्ये ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ या डॉक्युमेंट्रीला नॉन फिक्शनमध्ये पारितोषिक मिळाले आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये व्हिएतनाम, भारत आणि नामीबिया मधील ज्या किशोरवयीन मुलींनी त्यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील पूर्ण केले अथवा शिक्षण घेत आहेत, त्यांचे अनुभव दाखवण्यात आले आहेत.

जुग जुग जियो सिनेमात दिसणार प्राजक्ता

प्राजक्ता कोळी हे नाव यूट्यूबसाठी आणि तरुणाईसाठी नवं नक्कीच नाही. गेल्यावर्षी तिने नेटफिलिक्सवर रिलीज झालेल्या ‘मिसमॅच्ड’ सीरिजमध्ये काम केले होते. यात तिच्यासोबत रोहित सराफ देखील होता. आता प्राजक्ता ‘जुग जुग जियो’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत नीतू कपूर, अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.



[ad_2]

Source link