फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- Advertisement -

हायलाइट्स:

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
  • फडणवीस यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या केल्या सूचना
  • कार्यवाहीची माहिती देण्याचेही दिले निर्देश

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्ष भाजप सोडताना दिसत नाही. त्यातूनच भाजपचे नेते विविध मुद्द्यांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदनं देत असतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही यास अपवाद नाहीत. मागच्याच आठवड्यात फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेऊन काही मागण्या त्यांच्यापुढं मांडल्या होत्या. त्यांची तातडीनं दखल घेऊन राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. (Governor Bhagatsingh Koshyari writes to cm Uddhav Thackeray)

वाचा: ‘शरद पवारांना मी मोठा नेता मानत नाही, तुम्ही मानत असाल तर तो तुमचा प्रश्न’

मागील आठवड्यात २३ जून रोजी फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राज्यपालांना मागण्यांची दोन निवेदनं दिली. त्यापैकी एक विधिमंडळ अधिवेशनाशी (Maharashtra Assembly Session) संबंधित आहे तर दुसरं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवसांचा ठेवण्यात आला आहे. राज्यापुढं सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळं सरकारनं पळ न काढता अधिवेशनाच्या कालावधीत वाढ करावी, नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेलं विधानसभेचं अध्यक्षपद तातडीनं भरण्यात यावं तसंच, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं सध्याच्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशा तीन मागण्या फडणवीस यांनी राज्यपालांकडं निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत.

राज्यपालांनी या मागण्यांची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. ‘फडणवीसांनी मांडलेले तिन्ही विषय महत्त्वाचे आहेत. त्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती मला द्यावी,’ असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

वाचा:काँग्रेसनं मोठे बदल टाळले; विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव?

Source link

- Advertisement -