‘रंग माझा वेगळा’ मालिकेत घरच्यांच्या विरोधात जाऊन कार्तिकने दीपाबरोबर लग्न केलं होतं. एकमेकांच्या प्रेमात असलेलं हे जोडपंही आता दुरावलेलं आहे. त्यांच्यात सध्या घटस्फोट पर्व सुरु झालं आहे. हीच दुराव्याची परिस्थिती ऐश्वर्या-सूर्यभान (तू सौभाग्यवती हो), लतिका-अभिमन्यू (सुंदरा मनामध्ये भरली) या मालिकेतही दिसून येतेय. दोन्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे नायक-नायिकांना लग्न करावं लागलं आहे. पण या लग्नाभोवतीच मालिकेची कथा फिरतेय. या कथेत आता मात्र रंजक वळण आलं आहे. या नायक-नायिकांमध्ये हा दुराव्याचा धागा आता पूर्णपणे तुटतो का की त्यांच्यातील प्रेमाचं नातं पुन्हा एकदा फुलतं? हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी मनोरंजक असणार आहे. पण, म्हणतात ना भांड्याला भांडं लागल्याशिवाय राहत नाही. तसंच भांडण केल्याशिवाय प्रेम वाढत नाही. हीच बाराखडी या मालिकांमध्ये पुढील भागांमध्ये असेल; असा अंदाज वर्तवला जातोय.
मालिका आणि दुरावा आलेली जोडपी
अग्गंबाई सूनबाई : सोहम – शुभ्रा
आई कुठे काय करते : अरुंधती – अनिरुद्ध
रंग माझा वेगळा : दीपा – कार्तिक
सुंदरा मनामध्ये भरली : लतिका – अभिमन्यू
आई कुठे काय करते : अभिषेक-अंकिता
तू सौभाग्यवती हो : ऐश्वर्या – सुर्यभान