Home मनोरंजन Indian Idol 12 : ‘मदत करताना फोटो काढणं गरजेचं आहे का?’ म्हणत नेटकऱ्यांनी सोनू कक्करला केलं ट्रोल

Indian Idol 12 : ‘मदत करताना फोटो काढणं गरजेचं आहे का?’ म्हणत नेटकऱ्यांनी सोनू कक्करला केलं ट्रोल

0
Indian Idol 12 : ‘मदत करताना फोटो काढणं गरजेचं आहे का?’ म्हणत नेटकऱ्यांनी सोनू कक्करला केलं ट्रोल

[ad_1]

हायलाइट्स:

  • इंडियन आयडलचा १२ वा सीझन सातत्यानं सोशल मीडियावर आहे चर्चेत
  • परीक्षक सोनू कक्कर सोशल मीडियावर ट्रोल
  • हा रिअॅलिटी शो वादांमुळेच जास्त चर्चेत राहिला आहे

मुंबई: सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडल मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. एकीकडे या शोमधील स्पर्धकांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर चालताना दिसत आहे. तर दुसरीकडे टीआरपीसाठी मेकर्स देखील असं काही करतात की ज्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसते. खासकरुन या शोच्या परीक्षकांर सातत्यानं टीका होत असते. मागच्या काही दिवसांपासून नेहा कक्करच्या जागी तिची बहीण सोनू कक्कर या शोची परीक्षक म्हणून काम पाहत आहे. पण सध्या तिलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

Indian Idol 12- पवनदीप राजननं अरुणिताला केलं प्रपोझ! सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

इंडियन आयडल १२च्या सुरुवातीला गीतकार संतोष आनंद यांनी या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी त्याची सध्या आर्थिक परिस्थिती पाहता नेहा कक्करनं त्यांना पाच लाख रुपयांचा चेक दिला होता. त्यानंतर आता तिची बहीण सोनू कक्करनंही असंच काही केलं आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या सिनियर सिटीझन स्पेशल एपिसोडमध्ये स्पर्धक पवनदीप राजनला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेला सोनू कक्करनं मदत केली. त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.


लता भगवानकरे नाव्याच्या महिलेनं पवनदीप राजनला पाठिंबा देण्यासाठी इंडियन आयडल १२ च्या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांची कहाणी शेअर केली. लता यांनी आपल्या पतीच्या उपचारांसाठी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी ऐकून सर्वच भावूक झाले. या महिलेला सोनू कक्करनं आर्थिक मदत केली. अर्थात तिनं किती मदत केली हे समोर आलं नसलं तरीही यावेळी पैशांचा चेक देताना फोटो काढल्यानं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

Indian Idol 12- जावेद अख्तर, अनु मलिक यांच्या परीक्षेत पास होणार का अरुणिता कांजीलाल?

सोशल मीडियावर अनेक युझर्सनी ‘मदत करताना फोटो काढणं गरजेचं आहे?’ असं म्हणून ट्रोल करायला सुरुवात केली आहे. याशिवाय इतर परीक्षकही सोशल मीडियावर सातत्यानं ट्रोल आहेत. एकंदर संपूर्ण शोवरून सोशल मीडियावर मीम्स शेअर केले जातात.



[ad_2]

Source link