हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ७७१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण १० हजार ३५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १४१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या १४१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख १९ हजार ९०१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेच्या महापौर खडसेंच्या भेटीला; अर्धातास बंद दाराआड चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ३६४ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात हा आकडा १७ हजार ४०७ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाण्यात एकूण १६ हजार ११५ इतके रुग्ण आहेत. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ४४४ इतकी आहे. सांगलीत ही संख्या १० हजार २३३, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ५४१, रत्नागिरीत ५ हजार ३६६, रायगडमध्ये ५ हजार ३८५, सिंधुदुर्गात ४ हजार ४७९, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ००३ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४९४ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- पुणे ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका; ‘त्या’ २३ गावांचा महापालिकेत समावेश
यवतमाळमध्ये फक्त ६२ सक्रिय रुग्ण
या बरोबरच अहमदनगरमध्ये २ हजार ८१३ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ३००, नांदेडमध्ये ही संख्या ८२१ इतकी आहे. जळगावमध्ये ९५८, तसेच अमरावतीत ही संख्या ३४३ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ६२ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- आता मुस्लिम आरक्षणाची लढाई; वंचित बहुजन आघाडीचा ५ जुलैला विधानभवनवर मोर्चा
६,१७,९२६ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १६ लाख ३७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ६१ हजार ४०४ (१४.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १७ हजार ९२६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार १७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.