ती काही बोलण्यापूर्वीच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रत्येकजण जड अंतःकरणाने मंदिराला भेटायला गेले होते. पण जेव्हा ते घराबाहेर आले तेव्हा त्यांचे लालसर डोळेच सारं काही सांगत होते. मंदिराने जे गमवलंय त्याची कधीच भरपाई केली जाऊ शकत नाही याची जाणीव त्यांच्या डोळ्यात होती.

बॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक सुलेमान मर्चंट आणि त्याची पत्नी रेश्मा मर्चंटही तिच्या समर्थनासाठी मंदिराच्या घरी पोहोचले. त्यांचे डोळेही ओलसर होते. त्यांच्याकडे सांगायला काही नव्हते. फक्त राज कौशल अशा प्रकारे कसा गेला हा एकच प्रश्न त्यांच्या मनात होता.
‘उद्याचा दिवस कोणी पाहिलाय’ राज कौशल यांची पोस्ट ठरली खरी
बॉलिवूड अभिनेता आशिष चौधरीही संध्याकाळी उशिरा मंदिरा बेदीच्या घरी पोहोचला. मंदिरा आणि आशिष फार चांगले मित्र आहेत. आशिष बुधवारी सकाळपासूनच मंदिरासोबत होता. रात्रीही तिची चौकशी करण्यासाठी तो तिच्या घरी गेला होता. आशिषने राज कौशल दिग्दर्शित ‘शादी का लड्डू’ सिनेमात काम केले होते. तेव्हापासून म्हणजे २००४ पासून दोघेही चांगले मित्र होते.


बुधवारी मंदिरा बेदीला भेटण्यासाठी अर्शद वारसीची पत्नी मारिया गोरेट्टीही गेली होती. काही कारणांमुळे अरशद पोहचू शकला नाही, परंतु मारियाने जाऊन मंदिरालाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. बॉलिवूड अभिनेत्री अदिती गोवित्रीकरही मंदिराला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली होती. राज कौशल प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक होते. अदितीने त्याच्यासोबत बर्याच जाहिरातींमध्ये काम केले आहे.

अभिनेता रोहित रॉयदेखील मंदिरा बेदीला भेटायला गेला होता. बुधवारी रोहितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने राजच्या रूपाने त्याचा सर्वात चांगला मित्र गमावला असल्याचं सांगितलं. त्याचा मोठा भाऊ रोनित रॉय बुधवारी सकाळीच मंदिराच्या घरी पोहोचला होता. राज यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच तो मदतीसाठी धावणारा पहिला अभिनेता होता. रोनितने मंदिराला धीर देण्याचं काम केलं.


अभिनेत्री मौनी रॉय देखील संध्याकाळी उशिरा मंदिराला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली होती. तिच्या मनातली निराशा तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. ती कोणाशीही न बोलता मंदिराला भेटली आणि तिथून थेट आपल्या गाडीत बसून निघून गेली. अभिनेत्री रवीना टंडनही रात्री उशिरा मंदिरा बेदीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेली होती. राज कौशल आणि मंदिरा यांना दोन मुलं आहेत. मुलगा वीर आणि मुलगी तारा. (फोटो क्रेडिट : @manav.manglani)