हायलाइट्स:
- वडिलांसोबत चित्रपट पाहताना यायचे इंटिमेट सीन
- तापसीसोबत घरातील सगळ्यांचा उडायचा गोंधळ
- ‘हसीन दिलरुबा’ नंतर तापसीचे ‘लूप लपेटा’, ‘दोबारा’ प्रदर्शनाच्या वाटेवर
शालिनी आणि जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी रंगकर्मींचं आंदोलन
या प्रश्नावर उत्तर देताना तापसी म्हणाली, ‘आमचं कुटुंब एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब होतं. घरात एक टीव्ही होता. माझे वडील नेहमीच इंग्रजी चित्रपट पाहायचे. ऍक्शन असलेले चित्रपट त्यांना आवडायचे. ते पाहायचे मग आम्हालाही तेच पाहायला लागायचं. आम्ही चित्रपट पाहण्यासाठी कुठे बाहेर जाऊ शकत नव्हतो. इंग्रजी चित्रपट असल्यामुळे त्यात इंटिमेट सीन असणं स्वाभाविक होतं. पण परिस्थिती तेव्हा अवघड होते जेव्हा तुमच्या बाजूला तुमची तरुण मुलं बसलेली असतात. अनेकदा असं व्हायचं की, आम्ही एकमेकांसोबत बसलेलो आहोत आणि एखादा इंटिमेट सीन सुरू व्हायचा. मग सगळ्यांचाच गोंधळ उडायचा. काय करायला हवं हे कुणालाच कळत नव्हतं.’
वडिलांच्या वागण्याबद्दल सांगताना तापसी म्हणाली, ‘अशा वेळेस माझे वडील नेहमी शक्कल लढवायचे. इंटिमेट सीन आल्यावर ते मला पाणी आणायला पाठवायचे, नाहीतर टीव्हीचं चॅनेल बदलायचे. माझ्यासोबत असं अनेकदा झालंय. पण मला कधी कोणी पकडलं नाहीए.’ तर तापसीसोबत असणाऱ्या विक्रांतने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, त्याला त्याच्या मावशीने पकडलं होतं. ‘हसीन दिलरुबा’ नंतर तापसीचे ‘लूप लपेटा’, ‘दोबारा’, ‘रश्मि रॉकेट’ और ‘शाबाश मिठू’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत.
राज यांनी संध्याकाळीच मंदिराला सांगितलं, ‘मला हार्टअटॅक येतोय’