[ad_1]
हायलाइट्स:
- मृत्यूपूर्वी राज आणि मंदिराने घेतला होता प्रॉपर्टीबाबत मोठा निर्णय
- राज आणि मंदिराचा मढ येथे आहे आलिशान विला
- राज आणि मंदिराच्या विलाशी निगडीत अनेक आठवणी
काय घेतला होता निर्णय
राज आणि मंदिरा यांचा मड आयलंड येथे एक आलिशान विला आहे. हा विला त्यांनी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एअरबीएनबीच्या माध्यमातून हा विला सर्वसामान्य लोकांनाही भाड्याने घेता येणार आहे.
समुद्रकिनारी आहे आलिशान विला
राज आणि मंदिरा यांचा हा आलिशान विला मड आयलँड येथील समुद्रकिनारी आहे. हा विला मंदिरा आणि तिची आई गीता बेदी यांनी १५ वर्षांपूर्वी विकत घेतला होता. त्यानंतर हा विला सिनेमा आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी भाड्याने दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रीकरणानुसार या विलामध्ये सातत्याने रिनोवेशन केले आहे.
सहा महिन्यांपूर्वी केले होते रिनोवेशन
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा-सात महिन्यांपूर्वीच राज आणि मंदिराने या बंगल्याचे रिनोवेशन केले होते. त्यानंतर या दोघांनी हा विला सर्वसामान्य लोकांनाही भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. हा बंगला सर्वसामान्य लोकांना एअरबीएनबीच्या माध्यमातून भाड्याने घेता येणार आहे.
सर्वसोयीसुविधांनी परिपूर्ण विला
मड आयलंडमध्ये असलेल्या या विलामध्ये चार मोठ्या खोल्या आहेत. त्यामध्ये सर्व सोयीसुविधा आहेत. सेंट्रलाईज एसी असून आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे आहेत.
विलात आहे खासगी स्विमिंग पूल
या आलिशान विलामध्ये सर्वसोयी सुविधा आहेतच. याशिवाय येथे स्विमिंग पूल देखील आहे. हे स्विमिंग पूल समुद्राच्या दिशेने असल्याने अतिशय विलोभनीय दृश्य येथून दिसते.
राज-मंदिरा मुलांसह यायचे
मंदिरा आणि राज यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी या विलाशी निगडीत आहेत. हे दोघेजण अनेकदा आपल्या मुलांना घेऊन सुट्ट्यांमध्ये या विलामध्ये यायचे. मंदिरा आणि राज यांना वीर आणि तारा ही दोन मुले आहेत.
[ad_2]
Source link