हायलाइट्स:
- अभिनेत्री यामी गौतमला ईडीची नोटीस
- अभिनेत्रीने फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप
- चौकशीसाठी हजर न झाल्यास अटक होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार यामीने परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे अर्थात फेमाचे उल्लंघन केल्यामुळे तिची ही चौकशी केली जाणार आहे. यामीने हा गैरव्यवहार कोणत्या व्यवहारात केला याबद्दल अद्याप कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामी गौतमने तिच्या खासगी बँक खात्यामधून परदेशी चलनाचे व्यवहाह केले आहे. त्याची माहिती तिने संबंधित व्यवस्थेला दिली नाही. या आर्थिक व्यवहारांमुळे यामी अडचणीत आली असण्याची शक्यता आहे. हा व्यवहार तिने कोणासोबत केला, या संदर्भात ईडी तिची चौकशी करणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धर बरोबर लग्न केले होते. या लग्नामुळे ती खूपच चर्चेत आली होती. आदित्य आणि यामी लग्नांतर मुंबईत परतले असून दोघांनीही त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. आदित्य आणि यामीने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले होते. ‘उरी’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून अमाप यश मिळवणाऱ्या आदित्यने याआधी ‘काबूल एक्स्प्रेस’, ‘तेज’, ‘आक्रोश’सारख्या चित्रपटांसाठी गीतकार, पटकथाकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या यामीनेही गेल्या काही वर्षात अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.