हायलाइट्स:
- ‘सैराट’ फेम लंगड्या म्हणजे तानाजी गळगुंडेने केलं न्यूड फोटोशूट
- सोशल मीडियावर रंगलीये तानाजीच्या फोटोची चर्चा
- शरीराची सकारात्मकता यासाठी केलं खास फोटोशूट
ती असं काही करुच शकत नाही,आमचा पोलिसांवरही विश्वास नाहीए; बहिणीकडून हिनाची पाठराखण
दमदार कथानकातून आणि नवख्या तरीही उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयातून तयार झालेला ‘सैराट‘ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटातील लंगड्याचं पात्र साकारणारा तानाजी गळगुंडे चांगलाच गाजला होता. तानाजी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तानाजीने नुकतंच न्यूड फोटोशूट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. रावण फ्युचर प्रोडक्शनसाठी तानाजीने हे फोटोशूट केलं. या फोटोत तानाजी गिटार घेऊन उभा आहे. तानाजीचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. परंतु, हे फोटोशूट करण्यामागचं कारणही तानाजीने स्पष्ट केलं. तानाजीच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, ‘माझे पाय तर योग्य रचनेत नाहीयेत, पण माझं संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!’
शरीराची सकारात्मकता या विषयावर हे खास फोटोशूट करण्यात आलं आहे. तानाजीच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तानाजीने इतरांच्या शरीराकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या फोटोतून देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी वनिताच्या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. आता तानाजीचा फोटोदेखील नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
लिसा हेडन तिसऱ्यांदा झाली आई, हटके पद्धतीने शेअर केली गोड बातमी