Home मनोरंजन सायन्स बोलता है! तनिषा मुखर्जीला नाही आता बाळाची काळजी, स्वीकारला Eggs Freezing चा पर्याय

सायन्स बोलता है! तनिषा मुखर्जीला नाही आता बाळाची काळजी, स्वीकारला Eggs Freezing चा पर्याय

0
सायन्स बोलता है! तनिषा मुखर्जीला नाही आता बाळाची काळजी, स्वीकारला Eggs Freezing चा पर्याय

[ad_1]

मुंबई- गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये एग फ्रीजिंग (बीजकोशातील अंडी शीत अवस्थेत ठेवणे) करण्याचा ट्रेण्ड वाढताना दिसत आहे. एकता कपूर, मोना सिंगपासून ते राखी सावंतपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी एग फ्रीजिंगचा पर्याय निवडला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री आणि काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी हिनेही एग फ्रीजिंगचा पर्याय निवडल्याचं सांगितलं.

तनिशाने सांगितले आहे की वयाच्या ३३ व्या वर्षी तिला एग फ्रीजिंग करण्याची इच्छा होती, परंतु तिच्या डॉक्टरांनी तिला असे करण्यास नकार दिला. तनिषा म्हणाली की जेव्हा गरोदर राहण्याची शक्यता नव्हती तेव्हा डॉक्टरांनी एग फ्रीजिंगचा पर्याय सुचवला. अखेर तिने वयाच्या ३९ व्या वर्षी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा पर्याय निवडला.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तनिषा म्हणाली, ‘मला वयाच्या ३३ व्या वर्षीच एग फ्रीजिंग करायचे होते. जेव्हा मी माझ्या डॉक्टरांकडे गेले, त्यावेळी त्याने मला तसे करण्यास नकार दिला. जेव्हा आई होण्याची कोणतीच शक्यता नव्हती त्यानंतर डॉक्टरांनी मला हा सल्ला दिला. ही माझी वैयक्तिक निवड आहे आणि मुल व्हायलाच हवं असंही काही आवश्यक नाही.’

तनिषा म्हणाली की, मुल जन्माला घालणं फक्त हेच स्त्रीच्या जीवनाचं उद्दीष्ट नाही. एखाद्या महिलेला मुल नसलं तरी हरकत नाही. यासोबतच तनिषा असेही म्हणाली की, लग्न करायलाचं हवं किंवा एखाद्यासोबत नात्यात असायलाच हवं असंही काही आवश्यक नाही.

एग फ्रीजिंगबद्दल तिची आई तनुजा यांची काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न अभिनेत्रीला विचारला असता तनिषा म्हणाली की, आईने नेहमीच मला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामध्येही आईने आधीप्रमाणेच पाठिंबा दर्शविला. तनिषा म्हणाली की तिची आई एक अतिशय पुरोगामी आणि आधुनिक विचारसरणीची स्त्री आहे.

[ad_2]

Source link