Home ताज्या बातम्या coronavirus in mumbai: मुंबईच्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येत वाढ; पाहा, ताजी स्थिती!

coronavirus in mumbai: मुंबईच्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येत वाढ; पाहा, ताजी स्थिती!

0
coronavirus in mumbai: मुंबईच्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येत वाढ; पाहा, ताजी स्थिती!

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत ६६४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज मुंबईत एकूण ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत किंचितशी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात ६६४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४५३ इतकी होती. तर, दिवसभरात ७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. काल ही संख्या ४८२ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ५६७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (mumbai registered 664 new cases in a day with 744 patients recovered and 9 deaths today)

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ८४४ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- आज राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र, मृत्यू घटले

मुंबईत आज ३१ हजार ९४४ चाचण्या

मुंबईत आज एकूण ३१ हजार ९४४ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये १३ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ६८ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- एकनाथ खडसे यांची अडचण वाढली, ईडीने बजावले समन्स

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ६६४
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ७४४
बरे झालेले एकूण रुग्ण – ७००५६७
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७८१६
रुग्ण दुपटीचा कालावधी- ८४४ दिवस
कोविड वाढीचा दर ( ३० जून ते ०६ जुलै)- ०.०८ %

क्लिक करा आणि वाचा- सरपंच ते केंद्रीय मंत्री; पाहा, कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास!

Source link