Home ताज्या बातम्या डेल्टा प्लसचा धोका; लसीकरणानंतरच्या संसर्गाचे कारण शोधणार

डेल्टा प्लसचा धोका; लसीकरणानंतरच्या संसर्गाचे कारण शोधणार

0
डेल्टा प्लसचा धोका; लसीकरणानंतरच्या संसर्गाचे कारण शोधणार

म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : या करोना संसर्गाच्या विषाणूच्या परावर्तित स्वरूपाने राज्यामध्ये काही काळासाठी चिंतेचे वातावरण तयार केले होते. मात्र अशाप्रकारचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण राज्यात अधिक नाही. या नमुन्यांच्या चाचण्यांसह लसीकरणानंतर जर कुणाला करोना झाला असेल, तर त्या संसर्गित व्यक्तीकडून घेतलेले नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठवण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनुकीय विश्लेषणासाठी विशेष प्रयोगशाळा तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या असलेली संख्या पुरेशी नाही. त्यामुळे विषाणूच्या परावर्तित स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी तसेच जनुकीय विश्लेषण करण्यासाठी ‘एनआयव्ही’ला नमुने पाठवण्यात येतात. लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता किती असते याचा अभ्यास करण्यासाठी हे विश्लेषण उपयोगी ठरणार आहे. राज्यातील विविध प्रयोगशाळांमधून हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. पंधरा दिवसाला पंधरा नमुने पाठवण्याचे बंधन या प्रयोगशाळांना देण्यात आले होते. आता लसीकरणानंतर संसर्ग झालेल्या करोना रुग्णांचे नमुने पाठवण्यासाठी कोणतेही बंधन ठेवण्यात आलेले नाही.

संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले, या प्रकारच्या अभ्यासामुळे लसीकरणामुळे संसर्ग झाल्यास तो किती तीव्र असतो, कोणत्या वयोगटामध्ये हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून आला, संसर्ग झाल्यानंतर तो किती दिवस राहतो, त्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज किती प्रमाणात लागते अशा विविध पातळ्यांवर या नमुन्याचे जनुकीय विश्लेषण महत्त्वाचे ठरणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, कस्तुरबा रुग्णालयामध्ये सुरू होणारी प्रयोगशाळा यासाठी मदतगार ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी तपासणी प्रयोगशाळा असावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पंधरा दिवसांमध्ये पंधरा नमुने पाठवायचे असतात. एखाद्या रुग्णाला लसीकरणानंतर पुन्हा संसर्ग झाल्यास तो का झाला, लस घेतली होती का, करोना झाला होता का, कोव्हॅक्सिन घेतली की कोव्हिशील्ड घेतली, असे महत्त्वाचे प्रश्न संबधित व्यक्तीला विचारले जातात. खासगी प्रयोगशाळांनी विनंती केली, तर त्यांच्याकडून असे काही नमुने घेऊन ते एनआयव्हीकडे पाठवले जातात. लस दिल्यानंतर करोना झालेल्या तसेच करोनाची पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली असल्यास तो नमुना घेतला जातो, असे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद उबाळे यांनी सांगितले.

प्रयोगशाळांमधूनही माहिती

विषाणूला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. लसीकरणानंतर या विषाणूचा फैलाव करण्याची क्षमता कमी झाली आहे का, यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्यांना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग झाला, तसेच ज्या व्यक्तीमध्ये लसीकरणाच्या पहिल्या डोस नंतर संसर्ग झाला, त्यांचे प्रमाण देशातील विविध प्रयोगशाळांमधून घेण्यात येणार आहे.

Source link