‘भाजपनं शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत, कारण…’

‘भाजपनं शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत, कारण…’
- Advertisement -

हायलाइट्स:

  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
  • नारायण राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छा
  • भाजपनं शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत – राऊत

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राजकीय टीका-टिप्पणीला जोर चढला आहे. मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह चार नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपनं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानायला हवेत,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut’s Reaction On Modi Cabinet Expansion)

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळालेले चार पैकी तीन नेते हे मूळचे भाजपचे नाहीत. ते अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेले आहेत. राऊत यांनी नेमकं हेच निदर्शनास आणलं. ‘आमच्याकडून भाजपला पुरवठा झाल्यामुळंच त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचंच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले आहे. याचाच अर्थ, महाराष्ट्रापुरतं मंत्रिमंडळाचा विचार करायचा झाला तर मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे,’ असा टोला राऊत यांनी हाणला.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमारांच्या घरी जायला वेळ आहे, स्वप्नील लोणकरच्या नाही’

नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबत बोलताना राऊत यांनी काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली. ‘नारायण राणे यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पण त्यांना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. आता राणेंपुढे रोजगार वाढवण्याचं मोठं काम किंवा आव्हान आहे. आपल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, राऊत यांनी राणेंना मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या.

‘मोदींनी काही पत्ते पिसले आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली असली तरी प्रकाश जावडेकर यांच्यासारखा अनुभवी आणि ज्येष्ठ मोहरा पडलेला आहे. अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदींनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यांची क्षमता पाहूनच ती दिली असावी. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली.

वाचा: ‘ठाकरे कुटुंबीयांविरोधात बोलून राणेंनी पद मिळवलं खरं, पण…’

‘कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, ‘मंत्रिपदं ही देशाची सेवा करण्यासाठी दिली जातात. विरोधकांना फटका देण्यासाठी मंत्रिपदाची खिरापत वाटली जात नाही. तसे असेल तर हा घटनेचा भंग आहे,’ असंही राऊत यांनी सांगितलं.

Source link

- Advertisement -