हायलाइट्स:
- मुंबई विमानतळावर दिसला अभिनेता रणवीर सिंह
- रणवीरच्या अतरंगी लूकमुळे आणि त्याच्या स्लिंग बॅगमुळे झाला ट्रोल
- तर काहींना रणवीरचा कूल अंदाज आवडल्याने केले कौतुक
या गोष्टीमुळे रणवीर झाला ट्रोल
रणवीरने जो आऊटफिट परिधान करत त्याच्यावर स्लिंग बॅग कॅरी केली होती. ही कॅरी बॅग गुचीची होती. यावेळी रणवीरने मास्क लावला होता. रणवीरच्या या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर कॉमेन्ट करायला सुरुवात केली. काहींनी त्याला ‘जोकर’ म्हटले आहे. तर एका युझर्सने लिहिले आहे, ‘अरे यार तू दीपिकाच्या वॉर्डरोबमधील सामन चोरून का वापरतोस…’ तर दुस-या एका युझर्सने लिहिले आहे की, ‘ जेव्हा तुम्ही चांगले दिसत नाही तेव्हा असे मजेशीर कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरायला निघता. लक्षात ठेवा त्यानंतरही तुमच्याकडे लोक लक्ष देत नाहीत…’
काही दिवसांपूर्वी रणवीरने त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी सिनेमाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. रणवीरच्या बायकोने दीपिकाने देखील त्याच्यासोबत एक रॅप डान्स करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत दीपिकाने ही माझा जगातील सर्वात आवडती व्यक्ती असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, वाढदिवसाच्याच दिवशी करण जोहरने रणवीर आणि आलिया भट्ट यांना घेऊन ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा करत असल्याची घोषणा केली होती. या सिनेमात या दोघांसोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील काम करणार आहेत. अनेक वर्षांनंतर धर्मेंद्र आणि जया बच्चन मोठ्या पडद्यावर एकत्र काम करणार आहेत.