Home मनोरंजन तैमूरच्या धाकट्या भावाच्या नावाचा खुलासा? ‘या’ नावाची सोशल मीडियावर चर्चा

तैमूरच्या धाकट्या भावाच्या नावाचा खुलासा? ‘या’ नावाची सोशल मीडियावर चर्चा

0
तैमूरच्या धाकट्या भावाच्या नावाचा  खुलासा? ‘या’ नावाची सोशल मीडियावर चर्चा

[ad_1]

मुंबई : करिना कपूर आणि सैफअली खानला २१ फेब्रुवारी २०२१ रोजी दुसरा मुलगा झाला. करिनाने त्यांच्या दुस-या मुलाला सोशल मीडियापासून दूरच ठेवले आहे. त्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते परंतु त्या फोटोंमध्ये त्याचा चेहरा दिसत नाही. तैमूरच्या जन्मानंतर या दोघांनी त्याचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. परंतु याची पुनरावृत्ती या दोघांनी त्यांच्या दुस-या मुलाच्यावेळीस केलेली नाही. त्यामुळे या दोघांचा दुसरा मुलगा प्रसिद्धी माध्यमांपासून दूरच आहे. त्यामुळे त्याच्याविषयी या दोघांच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे.

दुस-या मुलाला या नावाने हाक मारतात
करिना आणि सैफच्या दुस-या मुलाचा जन्म झाला तेव्हापासूनच त्याच्या नावाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. त्यांचे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. परंतु सैफ आणि करिनाने याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. परंतु बॉम्बे टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण त्याला ‘जेह’ म्हणून हाक मारतात. अर्थात हे त्याचे खरे नाव आहे की टोपणनाव हे लवकरच कळेल.


सैफला ठेवायचे आहे ‘हे’ नाव

करिना आणि सैफच्या दुस-या मुलाचे नाव ‘जेह’ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अर्थात त्याच्या या नावाबद्दल करिना आणि सैफने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. परंतु काहींच्या मते सैफला त्याच्या दुस-या मुलाचे नाव ‘मंसूर’ असे ठेवायचे आहे. हे नाव त्याच्या वडिलांचे आहे. दरम्यान, सैफ आणि करिनाच्या पहिल्या मुलाचा जन्म २० डिसेंबर २०१६ मध्ये झाला. तेव्हापासून तैमूरच्या अनेक बातम्या, अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचे तैमूर हे नाव ठेवण्यावरूनही खूप वाद निर्माण झाला होता आणि या दोघांना प्रचंड टीका सहन करावी लागली होती. त्यामुळे आता त्या गोष्टींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी म्हणून आतापर्यंत त्यांनी दुस-या मुलाच्या संदर्भात काहीही गोष्टी प्रसिद्धी माध्यमांसमोर आणलेल्या नाहीत.



[ad_2]

Source link