[ad_1]
हायलाइट्स:
- मृण्यमयी देशपांडेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
- मृण्यमयीने व्हिडीओ शेअर करत बहिण गौतमीवर केले आरोप
- चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी व्हिडीओवर केल्या कमेन्ट
‘माझा होशील ना‘ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली गौतमी देशपांडे तसेच ‘सारेगम लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी मृण्मयी देशपांडे या दोघी बहिणी छोट्या पडद्यावर खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. या दोघींचे एकमेकींवर खूप प्रेम आहे, हे तर सर्वश्रुत आहेच. परंतु असे जरी असले तरी या दोघींमध्ये काही गोष्टींवरून आजही वाद होतात. या संदर्भातला एक व्हिडीओ मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क गौतमीवर चोर असल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाली मृण्यमयी…
मृण्यमयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत गौतमीला टॅग केले. यात गौतमी कधीही सुधारणार नाही असंही म्हटलं. व्हिडीओमध्ये मृण्मयी म्हणते की, ‘मी आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडायला हा व्हिडीओ करत आहे. मी गौतमीच्या घरात आहे. मी तिचं कपाट लावत आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आतापर्यंतचे माझे सर्व हरवलेले कपडे मला मिळाले आहेत. ए टू झेड कपडे मला मिळालेत. त्या कपड्यांचे बोळे करून ते लपवण्यात आले होते. मी जेव्हा तिला विचारलं, ‘गौतू माझे हे टॉप्स ‘चुकून’ तुझ्याकडे आले आहेत का? त्यावर नाही ताई, नाही ताई असं सरळ उत्तर मला देण्यात आलं. तिच्या या कपाटात माझे सगळे कपडे लपवून ठेवण्यात आले होते. तुम्ही ज्या सईवरती प्रेम करता ती सई चोर आहे.’
व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, मृण्मयीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.
केवळ चाहतेच नाही तर संगीतकार- गायक डॉ. सलील कुलकर्णी, गीतकार वैभव जोशी, गायिका शमिका भिडे यांना देखील मृण्यमीच्या या व्हिडीओवर कमेन्ट करायचा मोह आवरला नाही. तर काही युझर्सनी हा आम्हा लहान भावंडांचा हक्क असल्याचे म्हटले आहे तर काहींनी प्रत्येक मोठ्या भावंडाची व्यथा मांडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
[ad_2]
Source link